मोटारसायकल अपघातात वडील ठार; मुलगा गंभीर
By Admin | Updated: August 26, 2014 22:43 IST2014-08-26T22:43:47+5:302014-08-26T22:43:47+5:30
एका मारोती व्हॅनने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात वडील जागीच ठार, तर मुलगा गंभीर जखमी

मोटारसायकल अपघातात वडील ठार; मुलगा गंभीर
मानोरा : अंत्यविधीकरिता जात असताना एका मारोती व्हॅनने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात वडील जागीच ठार, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना २५ ऑगस्टच्या सकाळी मानोरा ते मंगरूळपीर रस्त्यावरील हिवरा फाट्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्हय़ातील दिग्रस तालुक्यातील धनज खु. येथील परशराम रामजी आडे (वय ५५ वर्ष) व मनोहर आडे हे पिता-पुत्र आपल्या मोटारसायकलने बोरव्हा (चिपडे) येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. दरम्यान, भरधाव वेगाने मानोराकडून येणार्या मारोती व्हॅनने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे या घटनेत वडील परशराम आडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मनोहर गंभीरपणे जखमी झाला आहे. या प्रकरणी मारोती व्हॅन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.