शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 18:52 IST

मृतकांमध्ये शिक्षक आमदार सरनाईक यांचा पुतण्या, पुतणी व नातीचा समावेश

सुनील काकडे, वाशिम : मेडशीमार्गे अकोल्याकडे जात असताना पातूरच्या घाटातील नवीन बायपासनजिक दोन वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. या घटनेत वाशिमचे शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक यांचा पुतण्या रघुवीर अरूणराव सरनाईक (२८), पुतणी शिवानी अजिंक्य आमले (३०) आणि नात अस्मिता अजिंक्य आमले (९ महिने) यांच्यासह सिद्धार्थ इंगळे (पास्टूल, पातूर), शंकर ठाकरे आणि सुमेध इंगळे हे सहा जण जागीच ठार झाले; तर अन्य चार जण गंभीर जखमी आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रघुवीर याच्यासह कुटुंबातील अन्य मंडळी त्यांच्या एम.एच. ३७ व्ही ०५११ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने अकोल्याकडे चालले होते. यादरम्यान पातूरच्या घाटातील नवीन बायपासनजिकच्या नानासाहेब मंदिराजवळ विरूद्ध दिशेने भरधाव वेगात आलेले चारचाकी वाहन सरनाईक कुटुंबियाच्या वाहनास धडकले.

हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चक्काचूर होऊन रघूवीर, शिवानी, अस्मिरा यांच्यासह सिद्धार्थ इंगळे, सुमेध इंगळे आणि शंकर ठाकरे हे सहा जण जागीच ठार झाले; तर सपना देशमुख (४१) आणि वैभव देशमुख (११), पियूष देशमुख (११) आणि श्रेयस सिद्धार्थ इंगळे (३ महिने) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

या ह्रदयद्रावक घटनेची वार्ता वाशिममध्ये कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक आणि त्यांचे बंधू प्राचार्य अरूणराव सरनाईक यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. घटनेचा पुढील तपास पातूर पोलिस करित असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :washimवाशिम