शेतकर्‍यांना दोन कोटी रुपये विमा मिळणार

By Admin | Updated: July 20, 2014 22:57 IST2014-07-20T22:57:24+5:302014-07-20T22:57:24+5:30

६ हजार ६५९ शेतकर्‍यांचा समावेश

Farmers will get insurance of 2 crores | शेतकर्‍यांना दोन कोटी रुपये विमा मिळणार

शेतकर्‍यांना दोन कोटी रुपये विमा मिळणार

मानोरा : जगाचा पोशींदा म्हणवणार्‍या शेतकर्‍यांना नैसर्गीक आपत्तीक मदत मिळावी म्हणून राज्यशासनाने राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरु केली आहे. गतवर्षी मानोरा तालुक्यातील ६ हजार ६५९ शेतकरी पात्र ठरले असून त्यांना एक कोटी ९५ लाख ५९ हजार ७९९ रुपये म्हणजेच सुमार दोन कोटी रुपये विम्यापोटी मिळणार आहेत.
१७ हजार ४६१ लाभार्थी शेतकर्‍यांनी १२ हजार ११३ हेक्टर जमीनीचा पिकविमा काढला होता यासाठी या सर्व शेतकर्‍यांनी ४१ लाख ३७ हजार ६१४ रुपये विम्यापोटी भरले होते. त्यामध्ये दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मानोरा येथे १५ हजार ७९0 लाभधारकांनी १0 हजार ९१८ हेक्टर शेतीा विमा भरला होता, भारतीय स्टेट बँक शाखा मानोरा येथे १ हजार ४0६ शेतकर्‍यांनी ९३५ हेक्टर जमिनीचा तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत २६५ शेतकर्‍यांनी २५९ हेक्टर जमिनी विमा भरला होता. १७ हजार ४६१ शेतकर्‍यांपैकी उडीद पिकासाठी ४५ शेतकरी, मुग पिकासाठी ४७ शेतकरी सोयाबीन पिकासाठी ७ हजार ६९७ शेतकर्‍यांनी पैसे भरले होते अशा एकूण ७ हजार ७८९ शेतकर्‍यांना विमा लागू झाला नाही मात्र खरीप ज्वारीच्या विमा काढणार्‍या २ हजार ३६६ शेतकर्‍यांना तसेच कपाशी पिकाचा विमा काढणार्‍या ५ हजार १५२ शेतकर्‍यांपैकी २१३१ शेतकर्‍यांना विमा लागू झाला म्हणजेच १७ हजार ४६१ शेतकर्‍यांपैकी ६६५९ शेतकर्‍यांचा विमा लागू झाला हे विशेष.
कपाशी पिकाच्या विम्यापोटी १ कोटी ६२ लाख, ६५ हजार ७५७रुपये, तुर पिकाच्या विम्यासाठी १७ लापख ३९ हजार ७६0 रुपये तर ज्वारी पिकाच्या विम्यापोटी १५ लाख ५४ हजार २८२ रुपये असे एकूण सुमारे दोन कोटी रुपये शेतकर्‍यांना विम्या पोटी मिळणार आहेत.
** पिकविम्याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा  
शासनाचे वतीने राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरु आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती मध्ये शेतकर्‍यांचे पिक खराब होते किेंवा नुकसान होते. यावर्षी पावसाअभावी शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काहींनी दुबार पेरणी केली आहे. अशा परिस्थितीत जर पिक विमा काढला तर निश्‍चितच त्याचा फायदा शेतकर्‍यांना होतो म्हणून शेतकर्‍यांनी पिकविमा काढावा तसेच तलाठी, बँकेने त्यांना त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन येथील तालुका कृषी अधिकारी समाधान पडघान यांनी केले आहे.

Web Title: Farmers will get insurance of 2 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.