कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 20:08 IST2017-08-17T20:07:09+5:302017-08-17T20:08:20+5:30
मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील रामभाऊ सवाईराम जाधव नामक शेतकºयाने नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना १७ आॅगस्टला उघडकीस आली.

कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील रामभाऊ सवाईराम जाधव नामक शेतकºयाने नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना १७ आॅगस्टला उघडकीस आली.
रामभाऊ जाधव यांचेकडे साडेचार एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. आताही पावसाने दडी मारल्याने ते चिंताग्रस्त होते. या चिंतेतून त्यांनी दाभा परिसरातील शेतशिवारात विषारी द्रव्य प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. जाधव यांच्याकडे ३० हजाराच्या वर बँकेचे कर्ज होते. यासंदर्भात आकाश जाधव यांनी फिर्याद दिल्याने मंगरूळपीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.