शेतकरीपुत्राने स्वत:च्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र; मांडली शेतकऱ्यांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 05:32 PM2019-11-02T17:32:20+5:302019-11-02T17:33:39+5:30

रक्ताने लिहिलेले पत्र त्यांनी कारंजा तहसीलदारांमार्फत २ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

Farmer's son wrote to the Chief Minister with his own blood; Describe The agony of the farmers | शेतकरीपुत्राने स्वत:च्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र; मांडली शेतकऱ्यांची व्यथा

शेतकरीपुत्राने स्वत:च्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र; मांडली शेतकऱ्यांची व्यथा

Next
ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील बेंबळा येथील शेतकरीपुत्र विशाल देवेंद्र ठाकरे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणीही केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव (वाशिम):. स्वत:च्या रक्ताने पत्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्यांची दैना कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील शेतकरीपुत्र विशाल देवेंद्र ठाकरे याने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. हे रक्ताने लिहिलेले पत्र त्यांनी कारंजा तहसीलदारांमार्फत २ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या  हाती आलेल्या सोयाबीनच,कापूस या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. तुरीसह इतर पिकांची अवस्थाही पावसाने वाईट केली असल्याने शेतकऱ्यां ना आता उत्पादनाची आसच राहिली नाही. त्यामुळे असा परिस्थितीत शेतकरी संपूर्ण खचलेला आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा देवेंद्र ठाकरे यांनी आपल्या रक्ताने पत्रात नमूद करीत कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ घोषीत करण्यासह शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणीही केली आहे. हे पत्र तहसीदारांकडे सादर करतेवेळी देवेंद्र ठाकरे यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर डोईफोडे यांची उपस्थिती होती.

Web Title: Farmer's son wrote to the Chief Minister with his own blood; Describe The agony of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.