शेतकऱ्यांनी भाजीपाला, राेपवाटिका याेजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:54+5:302021-06-05T04:28:54+5:30

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये रोपवाटिकाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक ...

Farmers should take advantage of vegetable, rapvatika scheme | शेतकऱ्यांनी भाजीपाला, राेपवाटिका याेजनेचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी भाजीपाला, राेपवाटिका याेजनेचा लाभ घ्यावा

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये रोपवाटिकाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक लक्षांक शिल्लक असून याकरिता पात्र शेतकऱ्यांनी १० जूनपर्यंत तालुका कृषी अधिकारी कारंजा कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन कारंजाचे तालुका कृषी अधिकारी वाळके यांनी केले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची कायमस्वरूपी सोय असावी. सदर प्रकल्पाची एकूण किंमत ४.६० लाख असून अनुदान २.३० लाख मिळणार आहेत. कृषी पदविकाधारक महिला यांना प्रथम प्राधान्य राहील, महिला गट किंवा महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य, भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील. प्राप्त अर्जांची छाननी करून लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात येईल, असे कारंजाचे तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

Web Title: Farmers should take advantage of vegetable, rapvatika scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.