वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 03:40 PM2018-10-31T15:40:47+5:302018-10-31T15:41:26+5:30

वाशिम :  रिसोड तालुक्यातील पळसखेड लघु पाटबंधारे योजनेंतर्गंत शेतकºयांचे वाढीव मोबदल्याचे पैसे शेतकºयांना देण्यात यावे या मागणीसाठी या भागातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून मागणी केली.

Farmers' rams into collector's office in washim | वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  रिसोड तालुक्यातील पळसखेड लघु पाटबंधारे योजनेंतर्गंत शेतकºयांचे वाढीव मोबदल्याचे पैसे शेतकºयांना देण्यात यावे या मागणीसाठी या भागातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून मागणी केली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकºयांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
रिसोड तालुक्यातील पळसखेड लघु पाटबंधारे योजना मधील लघू पाटबंधारे विभागातर्फे शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या होत्या, परंतु शेतकºयांना त्यांच्या शेतीचा वाढीव मोबदला आजपर्यंत भेटला नाही. मौजे पळसखेड व बिबखेडयातील शेतकºयांना वाढीव मोबदला मिळण्यात यावे यासंदर्भात निकाल पण लागला आहे. तरी पळसखेड , बिबखेड येथील शेतकºयांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे याकरिता या परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून उपजिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे यांना निवेदन दिले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांच्यासोबत माणिकराव खरात, सुदामा विठोबा फड, कैलास कºहाड, देवीदास दराडे, हिरामन खरात, अंबादास खरात, दत्तराव खानझोडे, रामु गायकवाड, प्रदिप खरात, खुशाल खरात, मारोती गुंजकर, संतोष खरात, गणेश खरात, बालाजी खरात यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी येत्या ८ दिवसात शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी ग्वाही दिली.

Web Title: Farmers' rams into collector's office in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.