प्रकल्पाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध
By Admin | Updated: May 31, 2017 19:46 IST2017-05-31T19:46:45+5:302017-05-31T19:46:45+5:30
शिरपुर जैन : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवित काम बंद केले असून रस्त्याचे काम चांगले व रुंद करण्याची मागणी ३१ मे रोजी केली.

प्रकल्पाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपुर जैन : किन्ही घोडमोड मार्गे पर्यायी म्हणून केला जाणारा रस्ता अतिशय अरुंद व तकलादू बनविण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होवून मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवित काम बंद केले असून रस्त्याचे काम चांगले व रुंद करण्याची मागणी ३१ मे रोजी केली.
२००५ -०६ पासून मंजुरात असलेल्या मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला मागील दोन महिन्यापासून गती मिळाली आहे. सदर काम थंडबस्तयात पडले असतांना लोकमतने पाठपुरावा करुन सदर कामे त्वरित होण्यासाठी पुढाकार घेतला होता. याची दखल अधिकाऱ्यांनी घेवून कामाला गती दिली होती. सद्यस्थितीत पांगरखेडा ते चांडस गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम जोरात सुरु आहे. मात्र बुडित क्षेत्रात गेलेल्या शिरपूर मिर्झापूर रस्तयाला पर्याय म्हणून किन्ही घोडमोड मार्गे केलेला पर्यायी रस्ता अतिशय अरुंद व तकलादू बनविल्या जात आहे.
सदर होत असलेल्या कामाच्या निषेधार्थ ३० मे पासून मिर्झापूर, घाटा वासियांनी प्रकल्पाच्या कामाला विरोध करुन काम बंद ठेवण्याची मागणी केली होती. ३१ मे रोजी सुध्दा सदर कामावर जावून ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला आहे. याचप्रमाणे शिरपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात कॅनॉलचे खोदकाम पाच ते सात वर्षांपासून करण्यात आले, परंतु त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला अद्याप मिहालेला नाही. मोबदला त्वरित देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.