शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरच निकाली निघतील !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:35 IST2021-02-08T04:35:25+5:302021-02-08T04:35:25+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दि. ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ...

शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरच निकाली निघतील !
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दि. ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल मिटकरी, वाशिम जिल्हा परीषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, प्रदेश महिलाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, सुक्षना सलगर, बाबाराव खडसे, दिलीप जाधव यांच्यासह कारंजा, मानोरा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष व महिलाध्यक्षांची उपस्थिती होती. जयंत पाटील यांनी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात उपकालव्याकरिता प्रारूप आराखडयात नाव कारंजा, मानोरा तालुक्यांचे नाव समाविष्ट केल्याप्रति माजी आमदार प्रकाश डहाके यांनी जलसंपदामंत्र्यांचे आभार मानले. याप्रसंगी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रसन्ना पळसकर यांनी केले.