शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

रब्बी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 2:49 PM

आतापर्यंत केवळ १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगामात पीककर्ज मिळण्यासाठी शेतकरी संबंधित बँकांचे उंबरठे झिजवित आहेत. प्रशासकीय दिरंगाईमुळे पीककर्ज वाटपास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आतापर्यंत केवळ १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.कृषीप्रधान देशातील शेतकºयांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सन २०१९ या वर्षात खरीप हंगामात पावसाने दगा दिला. त्यानंतरही अनियमित पाऊस राहिल्याने सोयाबीन, मूग, उडदाच्या उत्पादनात घट आली. अवकाळी पावसाने तर पिकांचे प्रचंड नुकसान केले. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अल्प बाजारभावाची भर पडली. चोहोबाजूंनी आलेल्या या संकटातून सावरत अनेक शेतकºयांनी रब्बी हंगामात पीककर्जाच्या माध्यमातून पेरणी करण्याचा प्रयत्न केला. काही शेतकºयांना पीककर्ज मिळाले तर काही शेतकºयांचे प्रस्ताव लालफितशाहीत अडकले. २०१९-२० च्या रब्बी हंगामात पीककर्जासाठी ४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. रब्बी हंगाम संपत आला असताना ९ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अपवाद वगळता अन्य राष्ट्रीयकृत बँकांकडून पीककर्जासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत. शेतकºयांना विनाविलंब पीककर्ज वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी यापूर्वीच दिले आहेत. तथापि, काही बँकांकडून दिरंगाई होत असल्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. ४० कोटींच्या पीककर्जाचे उद्दिष्टसन २०१९ च्या रब्बी हंगामात ४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. सदर उद्दिष्’ट पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी दिल्या आहेत. तथापि, ९ डिसेंबरपर्यंत २२.१५ कोटींचे पीककर्ज वाटप होऊ शकले.यावर्षी शेतकºयांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागले. खरीप हंगामातही अनेक शेतकºयांना पीककर्ज मिळण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागले. आता रब्बी हंगामातील शेतकºयांना मागणीनुसार पीककर्ज मिळण्यास विलंब होतो. शेतकºयांची गैरसोय होता कामा नये, असे प्रशासनाचे आदेश असतानाही शेतकºयांना वेळेवर कर्ज मिळत नाही.

- आकातराव सरनाईकदेऊळगाव बंडा ता. रिसोड

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज