आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतक-यांची गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 19:06 IST2017-09-11T19:06:13+5:302017-09-11T19:06:33+5:30
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतु व महा-ई सेवा केंद्रावर सोमवारी शेतकºयांची एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.

आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतक-यांची गर्दी !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतु व महा-ई सेवा केंद्रावर सोमवारी शेतकºयांची एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.
राज्य शासनाने २००९ पासून ते ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्जमाफी जाहिर केली. तसेच सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीककर्ज पुनर्गठण केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्यात आले. याशिवाय नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना २५ हजार रुपयांपर्यंत अथवा २५ टक्के प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी पात्र शेतकºयांकडून १५ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहेत. शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्टीचे असल्याने सोमवारी अर्ज भरण्यासाठी विविध केंद्रांवर शेतकºयांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.