शेतकरी पिक विमापासून वंचित
By Admin | Updated: May 10, 2017 13:21 IST2017-05-10T13:21:18+5:302017-05-10T13:21:18+5:30
तलाठीच्या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकरी पिक विमा पासुन वंचित आहेत.

शेतकरी पिक विमापासून वंचित
आसोला खुर्द : तलाठीच्या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकरी पिक विमा पासुन वंचित आहेत.
आसोला खुर्द, व हातोली तलाठी हा कारंजा ते मानोरा अपडाऊन करत असल्याने आठवडयातुन शेतकऱ्यांना एकवेळ भेट देतात तरी अशा तलाठ्यांवर शासन कारवाई का करत नाही अशी चर्चा शेतकऱ्यांमधुन होत आहे. आसोला खुर्द, हातोली या शिवारातील अनेक शेतकऱ्याला पिक विमा मिळाला नाही. तलाठी यांना विचारले असता तुमचा खाते क्रमांक चुकीचा आहे असे उडवाउडवीचे उत्तरे देतात. या शिवारातील शेतकऱ्यांनी वारंवार तहसील येथे जावुन निवेदन दिले पण आसोला खुर्द, हातोली येथील तलाठी यांच्यावर काहीही फरक पडत नसल्याने अनेक श्ेतकरी पिक विमा पासुन वंचित आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याय व चुकीचा सर्व्हे करणाऱ्या तलाठीवर कडक कारवाई करुन चौकशी करण्याची मागणी आसोला खुर्द, हातोली या शिवारातील शेतकऱ्यांमधुन होत आहे.