लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : आपल्या विविध स्वरूपातील मागण्यांसाठी शेतकर्यांनी पुकारलेल्या संपाच्या सर्मथनार्थ ५ जून रोजी कारंजा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यास व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार प्रकाश डहाके यांनी केले आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४ जून रोजी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस गजानन अमदाबादकर, मोहन महाराज, राजाभाऊ चव्हाण, बाबाराव ठाकरे, ज्योती गणेशपुरे, ओमप्रकाश तापडिया, देवेंद्र राऊत उस्मान गारवे, विनोद भिंगारे, अक्षय जगताप, मुकेश जाधव, श्रीकांत ठाकरे यांच्यासह संभाजी बिग्रेडचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी संपाच्या सर्मथनार्थ ५ जून रोजी कारंजातील आंबेडकर चौकात होणार्या कार्यक्रमास शेतकर्यांनी सकाळी ११ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
शेतकरी सर्मथनार्थ आज कारंजा बंद
By admin | Updated: June 5, 2017 02:20 IST