पेरणीसाठी शेतकरी सज्ज !
By Admin | Updated: May 31, 2017 19:45 IST2017-05-31T19:45:01+5:302017-05-31T19:45:01+5:30
वाशिम : अवघ्या सात दिवसांवर मृग नक्षत्र येऊन ठेपला असून, पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी सज्ज असल्याचे दिसून येते. यावर्षी चार लाख १३ हजार १५० हेक्टरवर पेरणी गृहित धरली आहे.

पेरणीसाठी शेतकरी सज्ज !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवघ्या सात दिवसांवर मृग नक्षत्र येऊन ठेपला असून, पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी सज्ज असल्याचे दिसून येते. यावर्षी चार लाख १३ हजार १५० हेक्टरवर पेरणी गृहित धरली आहे.
गतवर्षी जिल्ह्यावर मेहेरबान असलेला वरूण राजा यावर्षीही वेळेवर हजेरी लावणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जमिन सज्ज ठेवत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. शेतातील नांगरणी, वखरणी व अन्य प्रकारची कामे आटोपली असून, आता केवळ पावसाची प्रतीक्षा आहे. गतवर्षी खरिप हंगामात चार लाख दोन हजार ४६६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यापैकी दोन लाख ८७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यावर्षी चार लाख १३ हजार हेक्टरवर पेरणी गृहित धरली असून, सोयाबीनची पेरणी दोन लाख ८० हजार ४०० हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.