भंगार साहित्यातून शेतकऱ्याने बनविली सायकल बोट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:55 PM2020-02-29T12:55:37+5:302020-02-29T12:57:38+5:30

केसिंग पाईप, सायकलचा जुना सांगडा, दोन टाकाऊ बेरिंग, सायकल चैन, पत्राचे चार पाते, एक पाईप आदी साहित्यांचा समावेश आहे.

Farmer made a bicycle boat from wreckage! | भंगार साहित्यातून शेतकऱ्याने बनविली सायकल बोट !

भंगार साहित्यातून शेतकऱ्याने बनविली सायकल बोट !

Next
ठळक मुद्देशेतीचे इतर साहित्य नेण्याकरिता या बोटीचा उपयोग होणार आहे भंगार साहित्य एकत्र तयार करून ही बोट बनवण्यात आली.यासाठी केवळ १७०० रुपये खर्च आल्याचे सुशांत भारती यांनी सांगितले.

- विवेकानंद ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : भंगार साहित्य तसेच टाकाऊ वस्तूपासून बाळखेड येथील युवा शेतकरी सुशांत भारती यांनी पाण्यावर चालणारी सायकल बोट बनविली आहे.
बहुतांश गावात शेतात जाण्याकरिता रस्ते नाही. नदीनाल्यातून जावे लागते. काही नाल्यांवर पुलही नाहीत. याला पर्याय म्हणून रिसोड तालुक्यातील बाळखेडा येथील बारावी शिक्षण घेतलेल्या सुशांत भारती यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. भंगार साहित्य तसेच टाकाऊ वस्तूंपासून सायकल बोट बनविली आहे. या बोटीचे वैशिष्ट्य म्हणजे एक क्विंटल वजन सहन करण्याची क्षमता आहे. नदीच्या एका टोकावरून दुसºया टोकावर जाण्याकरिता खते, बियाणे, औषधी व शेतीचे इतर साहित्य नेण्याकरिता या बोटीचा उपयोग होणार आहे. भंगार साहित्य एकत्र तयार करून ही बोट बनवण्यात आली. यामध्ये केसिंग पाईप, सायकलचा जुना सांगडा, दोन टाकाऊ बेरिंग, सायकल चैन, पत्राचे चार पाते, एक पाईप आदी साहित्यांचा समावेश आहे. यासाठी केवळ १७०० रुपये खर्च आल्याचे सुशांत भारती यांनी सांगितले. पैनगंगा नदीच्या काठावर बाळखेडा हे गाव वसलेले आहे. गावातील शेतकऱ्यांना नदी पार करून जावे लागते. सुशांत भारती यांचे शेतसुद्धा नदीच्या पलीकडे आहे. शेतात जाण्याकरिता साडेतीन किलोमीटरचा प्रवास आहे. या सायकल बोटीच्या माध्यमातून गेले तर काही मिनिटात शेत गाठू शकतो, असेही भारती म्हणाले. शेतात जाण्याचे अंतर, वेळ वाचण्याकरिता भारती यांनी भंगार साहित्यामधून तयार केलेली सायकल बोट ही रिसोड तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे.

Web Title: Farmer made a bicycle boat from wreckage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.