विजेच्या धक्काने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:59 IST2020-06-29T18:58:17+5:302020-06-29T18:59:50+5:30
विजेचा धक्का लागल्याने तालुक्यातील कारखेडा येथील विनोद मोहन जाधव (३६) या युवा शेतकºयाचा २८ जूनला मृत्यू झाला.

विजेच्या धक्काने शेतकऱ्याचा मृत्यू
ठळक मुद्देविनोद जाधव हा शेतात तणनाशक फवारणी करीत होता.पाणी आणण्याकरीता गेला असता, त्याला विद्युतचा धक्का लागला.
मानोरा : शेतात काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने तालुक्यातील कारखेडा येथील विनोद मोहन जाधव (३६) या युवा शेतकºयाचा २८ जूनला मृत्यू झाला. याप्रकरणी २९ जून रोजी मानोरा पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
मनोहर मोहन जाधव (३३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विनोद जाधव हा शेतात तणनाशक फवारणी करीत होता. दरम्यान फवारणीसाठी शेतालगत असलेल्या खोराडी नाला येथे पाणी आणण्याकरीता गेला असता, त्याला विद्युतचा धक्का लागला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी २९ जून रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास बिट जामदार गणेश जाधव करीत आहेत.