वाशिम : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ जूनच्या मध्यरात्रीपासून तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ ५ रुपये पटीने करण्यात आली असल्याने पाच रुपयांच्या नाण्यांची गरज भासत असून, दरवाढीच्या पहिल्याच दिवशी प्रवासी व वाहकांना पाच रुपयांच्या नाण्यांचाही तुटवडा जाणवला. कर्मचारी वेतनवाढ, डीझलच्या दरात वाढ आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढलेल्या खर्चामुळे एसटी महामंडळाने १५ जूनच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू केली आहे. ही भाडेवाढ पाच रुपये पटीने अर्थात एक,दोन, तीन किंवा चार रुपये शिल्लक किंवा कमी अशा फरकाचे तिकिट दर आता कालबाह्य झाले आहेत. तथापि, पाच रुपये पटीने तिकिट दराची आकारणी करताना एसटी महामंडळाने १.५० रुपये ते तीन रुपयांपर्यंतचा फटका प्रवाशांना दिला आहे. आता ही भाडेवाढ पाच रुपये फरकानेच झाली असल्याने बहुतांश बसफेºयांत प्रवास करणाºया प्रवाशांना वरचे पाच रुपये ठेवावे लागत असून, वाहकांनाही पाच रुपये परत करावे लागत आहेत. पाच रुपये सुटे नसलेल्या प्रवाशांना पाच रुपये देण्यासाठी वाहकांकडे पाच रुपयांची नोट किंवा नाणेही पुरेशा प्रमाणात नसल्याचे किंवा प्रवाशांकडे पाच रुपये सुटे नसल्याचा प्रकार भाडेवाढीच्या पहिल्याच दिवशी वाहकांना अनुभवायला मिळाला. अर्थात एसटी महामंडळाने पाच रुपये फरकाने केलेली भाडेवाढही सुट्या पैशांपासून दिलासा देणारी ठरणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पाच रुपये फरकाच्या भाडेवाढीचा प्रवासी, वाहकांंना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:00 IST
वाशिम : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ जूनच्या मध्यरात्रीपासून तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ ५ रुपये पटीने करण्यात आली असल्याने पाच रुपयांच्या नाण्यांची गरज भासत असून, दरवाढीच्या पहिल्याच दिवशी प्रवासी व वाहकांना पाच रुपयांच्या नाण्यांचाही तुटवडा जाणवला.
पाच रुपये फरकाच्या भाडेवाढीचा प्रवासी, वाहकांंना फटका
ठळक मुद्दे एसटी महामंडळाने १५ जूनच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू केली आहे. ही भाडेवाढ पाच रुपये पटीने अर्थात एक,दोन, तीन किंवा चार रुपये शिल्लक किंवा कमी अशा फरकाचे तिकिट दर आता कालबाह्य झाले .पाच रुपये पटीने तिकिट दराची आकारणी करताना एसटी महामंडळाने १.५० रुपये ते तीन रुपयांपर्यंतचा फटका प्रवाशांना दिला आहे.