विवाहितेवर अतिप्रसंग
By Admin | Updated: July 22, 2014 22:15 IST2014-07-22T22:15:31+5:302014-07-22T22:15:31+5:30
तहसिल कार्यालय परिसरातील एका खोलीमध्ये एका २५ वर्षीय विवाहीत महिलेवर एका इसमाने अतीप्रसंग

विवाहितेवर अतिप्रसंग
वाशिम : शहरातील तहसिल कार्यालय परिसरातील एका खोलीमध्ये एका २५ वर्षीय विवाहीत महिलेवर एका इसमाने अतीप्रसंग केल ही घटना २१ जुलै रोजी घडली असून पोलिसांनी आरोपिविरूध्द बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. एका २५ वर्षीय महिलेने वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. तीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, ्रइलखी ता. जि. वाशिम येथील रहिवासी किशोर पवार हा इसम अकोला नाका येथे भेटला. त्याने म्हटले की तुमच्या पतीने मला फोन करून सांगीतले की तुम्हाला खोली घेऊन देऊन तीला तेथेच थांबवा. त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून पिडीत महिला त्याचेसोबत तहसिल परिसरात गेली. त्याठिकाणी आरोपी पवार याचा मित्र होता. संध्याकाळ झाल्यानंतर तहसिल परिसरात असलेल्या एका खोलीमध्ये त्याने राहण्याची व्यवस्था केली व म्हटले की तुझे पती लवकरच येणार आहेत. त्यानंतर तो लगेच माझ्या खोलीमध्ये येऊन त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन अतीप्रसंग केला. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये पवार याचेविरूध्द भादंवि चे कलम ३७६, ५0६ प्रमाणे गुन्हा नोंदविला.