मालेगावात प्रयोगशिल शेतकऱ्याने पिकविली १० गुंठे जमिनीत अडीच लाखांची मिर्ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 14:52 IST2017-11-04T14:51:15+5:302017-11-04T14:52:37+5:30
मालेगाव (वाशिम): तालुक्यातील घाटा या गावातील शेतकरी बबन तुकाराम कुटे यांनी योग्य नियोजनातून आपल्या केवळ १० गुंठे जमिनीतून मिर्चीचे तब्बल अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया करून दाखविली आहे

मालेगावात प्रयोगशिल शेतकऱ्याने पिकविली १० गुंठे जमिनीत अडीच लाखांची मिर्ची
मालेगाव (वाशिम): तालुक्यातील घाटा या गावातील शेतकरी बबन तुकाराम कुटे यांनी योग्य नियोजनातून आपल्या केवळ १० गुंठे जमिनीतून मिर्चीचे तब्बल अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया करून दाखविली आहे. त्यांच्या या प्रयोगशिलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बबन कुटे यांच्याकडे वडीलोपार्जित १० एकर जमीन आहे. त्यावर त्यांनी २ कुपनलिका खोदलेल्या आहेत. कुपनलिका व एका विहिरीचे पाणी साठविण्यासाठी त्यांनी शेतात कृषी विभागामार्फत अनुदानावर मिळालेले ४४ बाय ३३ मीटर आकाराचे शेततळे खोदले. १० गुंठे जमिनीवर शेडनेट उभारले. शेडनेटसाठी ३.५० लाख रुपये खर्च आला. त्यापैकी २.५४ लाख रुपये त्यांना अनुदान मिळाले. मागीलवर्षी त्यांनी मिरचीचा सीड प्लॉट घेतला होता. त्यावर्षी त्यांना १.७० लाख रुपये किमतीचे मिरचीचे बियाणे झाले होते. त्यांनी मागील वर्षी ७१ किलो बियाणे २४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने विकले.त्यावर्षी त्यांना ४० हजार खर्च आला; तर निव्वळ नफा १.३० लाख रुपये मिळाला. यावर्षी त्यांना आतापर्यंत २० किलो बियाणे झाले आहे. यावर्षी एकूण ५० किलो बियाणे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. ५ हजार रुपये किलो याप्रमाणे त्याचे २.५० लाख रुपये त्यांना मिळतील. खर्च वजा जाता त्यांना २ लाख रुपये निव्वळ नफा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.