अतिविशेष मोहिम इंद्रधनुष्य अंतर्गत गरोदर माता, महिलांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 14:38 IST2018-05-25T14:38:32+5:302018-05-25T14:38:32+5:30

वाशिम: प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेंतर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे.

Exclusive campaign pregnant women and vaccination of women | अतिविशेष मोहिम इंद्रधनुष्य अंतर्गत गरोदर माता, महिलांचे लसीकरण

अतिविशेष मोहिम इंद्रधनुष्य अंतर्गत गरोदर माता, महिलांचे लसीकरण

ठळक मुद्दे लसीकरण मोहीमेत ज्या बाळाला किंवा मातेला लस देण्यात आली नाही.या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील २५ गावांत गरोदर महिला आणि दोन वर्षांखालील बालकांवर लसीकरण करण्यात येत आहे. आरोग्य सेवक वानखडे, आशा मदतनीस फाळेगावर यांनी लसीकरण प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.


वाशिम: प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेंतर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरण मोहीमेत ज्या बाळाला किंवा मातेला लस देण्यात आली नाही. त्यांना लसीकरण करण्याचे काम करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील २५ गावांत गरोदर महिला आणि दोन वर्षांखालील बालकांवर लसीकरण करण्यात येत आहे. 
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आसेगाव अंतर्गत सनगाव, शेलूबाजार आरोग्य केंद्रातील जांब, मूर्तिजापूर सह निवड झालेल्या गावांतील दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना डीपीटी, व्हिटॅमिन ए, गोवर, तसेच मेंदूज्वराची लस देण्यात आली. त्याशिवाय गरोदर महिलांना टी.टी.चे इंजेक्शन देण्यात आले. आसेगाव केंद्रांतर्गत सनगाव येथे पार पडलेल्या या मोहिमेत आसेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. एल. सुर्वे, आरोग्य सेविका दामले, कमल इंगोले, आरोग्य सेवक वानखडे, आशा मदतनीस फाळेगावर यांनी लसीकरण प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Exclusive campaign pregnant women and vaccination of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.