शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

परीक्षा शुल्क माफी निर्णयाची अंमलबजावणी शून्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 3:16 PM

- संतोष वानखडे वाशिम : आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे राज्यातील वाशिमसह ...

- संतोष वानखडेवाशिम : आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे राज्यातील वाशिमसह ३४ जिल्ह्यातील ३२५ तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पृष्ठभूमिवर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांचे शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ केले. या निर्णयाला सव्वा दोन महिन्याचा कालावधी होत असताना, अमरावती विभागात या निर्णयाची अंमलबजावणी नसल्याने पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्री वादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे वाशिम, अकोला बुलडाणा यासह राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३२५ तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. सदर आपदग्रस्तांना विशेष दराने मदत देण्याबाबत व विविध सवलती लागू करण्यासंदर्भातील महसूल व वन विभागाने १८ नोव्हेंबर २०१९ रोजी आदेश जारी केले होते. ज्या शेतकºयांच्या पाल्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमांकरीता प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे, त्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क संबंधित संस्थेमार्फत परत करण्यात यावे, असे शासन आदेशात स्पष्ट नमूद आहे. सदर आदेश जारी होण्यापूर्वी अमरावती विभागातील शेतकरी पाल्यांनी दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन परीक्षांचे शुल्क भरलेले होते. सव्वा दोन महिन्याच्या या कालावधी परीक्षा शुल्क भरलेल्या शेतकरी पाल्यांची माहिती संकलित करणे आणि परीक्षा शुल्क परत करण्याच्या दृष्टिने कार्यवाही होणे अपेक्षीत होते. मात्र, अद्याप शेतकरी पाल्यांची माहितीदेखील संकलित न केल्याने पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. वाशिम जिल्ह्यातील ७९३ गावांमधील शेतकरी पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ झालेले आहे. परंतू, याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. 

शेतकरी पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करावी यासंदर्भात शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात फेरआढावा घेण्यात येईल.- शैलेश हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम परीक्षा शुल्क माफी निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल. शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करू.- तानाजी नरळेशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र