शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मुदत संपत आली तरी तूर खरेदीसाठी नोंदणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 2:32 PM

तूर खरेदीसाठी नोंदणीची अंतिम मुदत २० मार्च असताना वाशिम, मानोऱ्यात अद्याप एकाही शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी दीड महिन्यांपूर्वी आदेश प्राप्त झाल्यानंतर तीन ठिकाणी खरेदी सुरू झाली. तथापि, या खरेदीसाठी नोंदणीची अंतिम मुदत २० मार्च असताना वाशिम, मानोऱ्यात अद्याप एकाही शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही. आठवडाभरापूर्वी वाशिम येथे खरेदीसाठी एका संस्थेला कंत्राट दिले असतानाही अद्याप येथे नोंदणी सुरू झाली नाही, तर मानोऱ्यात ऐनवेळी खरेदी विक्री संस्थेने खरेदीस नकार दिल्यामुळे येथे खरेदीची शक्यताच मावळली आहे.बाजार समित्यांत गेल्या दोन महिन्यांपासून तुरीचे दर कोसळत असताना शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या पृष्ठभुमीवर जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी तूर खरेदीसाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात मंगरुळपीर, मालेगाव आणि मानोरा येथे खरेदीसाठी काही संस्थानी पुढाकार दिल्याने येथील नोंदणी आणि खरेदी प्रक्रियाही सुरू झाली. त्याशिवाय रिसोड येथे खरेदी विक्री संस्थेने तयारी दर्शविल्यानंतर शेतकºयांची नोंदणी करण्यात आली; परंतु नाफेडच्या अटीमुळे त्यांनी खरेदीस नकार दिला, तर मानोरा आणि वाशिम येथे दहा दिवसांपूर्वी दोन संस्थांना खरेदीचा परवाना देणारे पत्र जिल्हा पणन अधिकाºयांनी दिले; परंतु या खरेदीसाठी शेतकºयांच्या नोंदणीची मुदत २० मार्च असताना वाशिम आणि मानोरा येथे १९ मार्चपर्यंतही नोंदणी प्रक्रिया सुरू झाली नाही, तर मानोरा येथे खरेदी विक्री संस्थेने खरेदी करणार नसल्याचे पत्र जिल्हा पणन अधिकाºयांना दिले. त्यामुळे मानोरा येथे तूर खरेदीच होणार नसल्याचे स्पष्ट झाले, तर वाशिम येथे शेतकºयांची २० मार्च रोजी नोंदणी होणार असल्याचे जिल्हा पणन अधिकाºयांनी स्पष्ट केले. नाफेडच्या खरेदीची ही स्थिती पाहता वाशिम आणि मानोरा येथील शेतकºयांना या खरेदीचा फायदाच होणार नसल्याचेही स्पष्ट होत आहे.  रिसोडच्या खरेदीसाठी दुसऱ्या संस्थेची निवडशासकीय तूर खरेदीसाठी मालाचा दर्जा निश्चित करण्याची अट अडचणीची असल्याचे सांगत रिसोड खरेदी विक्री संस्थेने खरेदीस नकार दिला आणि तसे पत्रही जिल्हा पणन अधिकाºयांना दिले आणि जाहीर सुचनाही प्रसिद्ध केली. त्यामुळे रिसोड येथे २०० शेतकºयांची नोंदणी होऊनही खरेदी अद्याप सुरुच झाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. अशात या ठिकाणी खरेदीसाठी वाशिम तालुक्यातील अनसिंगच्या विदर्भ कृषी प्रक्रिया संस्थेने तयारी दर्शविल्यानंतर या संस्थेकडे रिसोडच्या खरेदीची जबाबदारी सोपविण्यात आली. तथापि, अद्यापही या संस्थेकडून खरेदी सुरू झालेली नाही. वाशिम येथे एक दिवसाच्या नोंदणीचीच खरेदी वाशिम येथील खरेदीसाठी उमरा कापसे येथील जय गजानन महाराज कृषी प्रक्रिया संस्थेची निवड झाली असली तरी, या संस्थेकडून अंतिम मुदतीच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्थात १९ मार्चपर्यंतही शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली नाही. याबाबत जिल्हा पणन अधिकाºयांशी संपर्क साधून माहिती घेतली असता २० मार्च रोजी येथे नोंदणी होणार असून, या दिवशी जेवढी नोंदणी होईल. तेवढ्याच शेतकºयांकडून तुरीची मोजणी करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातही २० मार्च रोजी होळीचा सण असल्याने या दिवशी नोंदणी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमManoraमानोराFarmerशेतकरी