नगर परिषदेत गुंठेवारी नियमानुकूल करण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:20+5:302021-07-10T04:28:20+5:30
नगर परिषद वाशीममध्ये दर्शनी भागावर सदर अर्ज कोठे स्वीकारण्यात येतील, जेथे अर्ज स्वीकारण्यात येतील, कोणते कर्मचारी/अधिकारी राहतील त्यांचे नाव ...

नगर परिषदेत गुंठेवारी नियमानुकूल करण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन
नगर परिषद वाशीममध्ये दर्शनी भागावर सदर अर्ज कोठे स्वीकारण्यात येतील, जेथे अर्ज स्वीकारण्यात येतील, कोणते कर्मचारी/अधिकारी राहतील त्यांचे नाव व पद याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले बॅनर लावण्यात यावे. अर्जदाराचे संख्या पाहता नगर पालिकेला एका महिन्यात अर्ज छाननी करून निर्णय घेणे शक्य वाटत नाही. त्यामुळे न.प. न. सदर अर्ज मागविण्याकरिता वेळ वाढून द्यावा. तसेच दोन/तीन कर्मचारी अधिकारी यांची अर्जदाराचे अर्ज स्वीकारून, त्यांची त्रुटी असल्यास त्यांचे त्रुटीचे पत्र त्यांच्या मोबाइलवर संदेशद्वारे कळवून त्रुटीची पूर्तता व्यवस्थितरित्या करून घेणे करिता जबाबदारी ठरवावी तरच शासनाचा उद्देश सफल होईल व भूखंडधारकांना न.प.मध्ये या कामाकरिता वारंवार ये-जा करण्याचे काम पडणार नाही, अशा सूचना ७ जुलै २०२१ ला दिल्या होत्या. त्यावरून मुख्याधिकारी नगर परिषद वाशिम यांनी गुंठेवारी प्रकरणाकरिता वेगळे कक्ष स्थापन केले आहे.
.............
जबाबदारी असलेले अधिकाऱ्यांची नावे
१) रश्मी चंद्रकांत हलगे, रचना सहाय्यक २) अविनाश देशमुख, रचना सहाय्यक ३) गजानन अशोक पाटील ४) सुरेश बैरवार ५) सारिका आळणे हे आहेत. वरील अधिकाऱ्यांकडे गुंठेवारीचे अर्ज स्वीकारणे, गुंठेवारी नियमानुकूल करणे संबंधित अर्जावर कार्यवाही करणे, अर्जदारांना त्रुटी असल्यास कळविणे अशा जबाबदाऱ्या आहेत. भूखंडधारकांनी नगर परिषदेच्या पहिल्या माळ्यावर असलेले नियोजन विभाग येथेच आपले अर्ज/प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन खा. भावनाताई गवळी यांनी केले आहे.