५२ वर्षांपासून शाडूच्या मूर्तीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:30 IST2017-09-05T00:30:06+5:302017-09-05T00:30:35+5:30
पर्यावरणपुरक गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी शासन, प्रशासनाच्यावतीने आवाहन करून विविध उपक्रम राबविण्यात येत अस ताना मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथे गेल्या ५२ वर्षांपासून शाडूच्या मूर्तीचा स्थापना करून पर्यावरण जपण्यासह एक गाव एक गणपतीची परं परा गावकर्यांच्यावतीने जपली जात आहे. यंदाही या ठिकाणी शाडूच्या मू र्तीची स्थापना करण्यात आली आहे.

५२ वर्षांपासून शाडूच्या मूर्तीची स्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: पर्यावरणपुरक गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी शासन, प्रशासनाच्यावतीने आवाहन करून विविध उपक्रम राबविण्यात येत अस ताना मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथे गेल्या ५२ वर्षांपासून शाडूच्या मूर्तीचा स्थापना करून पर्यावरण जपण्यासह एक गाव एक गणपतीची परं परा गावकर्यांच्यावतीने जपली जात आहे. यंदाही या ठिकाणी शाडूच्या मू र्तीची स्थापना करण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील चेहेल हे लहान लोकवस्तीचे गाव आहे. या गावांत सर्वधर्माचे लोक एकोपा आणि सामंजस्याने सर्वच सणउ त्सव साजरे करतात. नवसाला पावणारा गणपती राजा म्हणून येथील गण पती ओळखला जातो. या ठिकाणी सर्वच सार्वजनिक उत्सवांप्रमाणे गेलय ५२ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यासाठी मूर्तीची निर्मि ती शाडूच्या मातीपासून केली जाते. गेल्या ५२ वर्षांपासून गावकर्यांनी ही परंपरा जपली आहे. गणेशोत्सवापूर्वी गावकरी चर्चा करून उत्सवात आयोजित करण्यात येणार्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करतात. म्हणून असा उपक्रम राबविणारे चेहेल हे जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे. आजवर या गावात गणेशोत्सवात एकदाही कोणत्याच कारणावरून वाद झाला नाही. विशेष म्हणजे या उत्सवात गावांत सासरहून आलेली मुलगी आणि जावयाचा सत्कार करण्याची परंपराही जपली जात आहे. दरवर्षी, गणेशोत्सवात भागवत सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणयात येते. यंदाही या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. या निमित्त वाढोणा रामनाथ येथील हभप नारायण महाराज चौधरी यांचे काल्याचे किर्तन आयोजि२त करण्यात आले असून, या कार्यक्रमानंतर गणेशभक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश विसर्जनात सर्वधर्मिय सहभागी होऊन शांततेत गणरायाला दरवर्षी निरोप देतात.
५२ वर्षांपासून एकच मूर्तिकार
चेहेल येथे गणेशोत्सवासाठी शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करण्यासाठी एकच मूर्तीकार मूर्ती बनविण्याचे काम गेल्या ५२ वर्षांपासून करीत आहेत. मोतीभाऊ असे त्यांचे नाव असून, गणेशोत्सवापूर्वीच ते मूर्ती बनविण्याची तयारी करतात. ही मूर्ती बनविण्यासाठी तब्बल ४५ दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी मोतीभाऊ यांना गावकर्यांच्यावतीने योग्य ते सहकार्य केले जाते. यापुढेही आपण हयात असेपर्यंत येथील मूर्ती बनविण्याची जबाबदारी पार पाडू, असा संकल्प मोतीभाऊ यांनी केला आहे. त्यांनी बनविलेली मूर्तीही आकर्षक असते. परिसरातील भाविकांसह मंगरुळपीर तालुक्यातील शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येऊन नवस कबूल करतात आणि तो फेडण्यासाठीही नियमित येतात.