चुका एजन्सीच्या; फटका विद्युत ग्राहकांना

By Admin | Updated: August 15, 2014 02:08 IST2014-08-15T02:02:37+5:302014-08-15T02:08:13+5:30

महावितरणने एजन्सी बदलली

Error agency; Power customers | चुका एजन्सीच्या; फटका विद्युत ग्राहकांना

चुका एजन्सीच्या; फटका विद्युत ग्राहकांना

वाशिम : गत दोन ते तीन महिन्यांपूर्वीचे विद्युत देयके व आताच्या विद्युत देयकामधील रकमेत मोठय़ा प्रमाणात तफावत असल्याने यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, यापूर्वी रिडिंग घेणार्‍या एजन्सीने चुकीचे मीटर रिडिंग घेतल्याने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके आकारण्यात आलीत. एजन्सीच्या चुकीचा विद्युत ग्राहकांना मात्र फटका सहन करावा लागला.
वीज वितरण कंपनीतर्फे इलेक्ट्रॉनिक विद्युत मीटर बसविल्यानंतर काही अडचणी ग्राहकांच्या राहणार नाही, असे वाटले होते; तसेच ह्यआय आरह्ण सेन्सर मीटरद्वारे व्यवस्थित वीज चोरी व वीज पावर कंपनीला कळवून देयके देण्यात येतील, असे ग्राहकांना वाटत असतानाच गत दोन महिन्याआधीचे देयके व आता येत असलेल्या देयकांमध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत आहे. गत दोन ते तीन महिन्याआधी ५00 ते ६00 रूपयांच्या दरम्यान आलेली विद्युत देयके चक्क वाढ होऊन १२00 ते १३00 रुपयांच्या घरात आली आहेत. गत दोन महिन्याआधी उन्हाळा असताना बिले कमी व पावसाळय़ात बिले जास्त, यामुळे ग्राहकांची ओरड होत आहे. विद्युत कार्यालयावर अनेक ग्राहक जावून चौकशी करीत असताना ज्या कंपनीकडे मीटर रीडिंगची कामे देण्यात आली होती. त्यांनी रिडिंग व्यवस्थित घेतली नसल्याने ही तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Error agency; Power customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.