हळदी कुंकवांच्या कार्यक्रमात रोप वितरणातून पर्यावरणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 03:35 PM2020-01-19T15:35:12+5:302020-01-19T15:35:18+5:30

यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंना पसंती दिली तर काही महिलांनी वृक्षसंवर्धनासाठी वृक्षांचे वाटप केले.

Environmental message from plant distribution in a program of Makar Sankranti | हळदी कुंकवांच्या कार्यक्रमात रोप वितरणातून पर्यावरणाचा संदेश

हळदी कुंकवांच्या कार्यक्रमात रोप वितरणातून पर्यावरणाचा संदेश

googlenewsNext

- नंदकिशोर नारे  
 
वाशिम : भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ करत महिलांनी संक्रांतीनिमित्त होणाº्या हळदीकुंकू समारंभात देण्यात येणारे वाण पर्यावरणपूरक बनवले आहे. यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तूंना पसंती दिली तर काही महिलांनी वृक्षसंवर्धनासाठी वृक्षांचे वाटप केले.
संक्रांत आली की, महिलांना वेध लागतात ते हळदी कुंकू कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात महिलांची ओटी भरुन त्यांना वाण देणयची प्रथा आहे. बाजारपेठेत या वाण खरेदीवर लाखो रुपयांची उलाढाल होते. महिलांना कडून वाटप करणारे वाण उपयोगात पडेलच असे नाही. तरी काही महिलांकडून वाण म्हणून मिळणारी वस्तु कोणाची मोठी व चांगली आहे यावरुनही स्पर्धा दिसून येते. परंतु वाशिम येथील विनायक नगरातील रहिवासी असलेल्या माधुरी भांडरकर , अनुराधा भांडेकर यांनी पारंपारिक वाणाला फाटा देत वाण म्हणून २५० व्क्षांचे वाटप केले. तसेच सदर वृक्ष संगोपनाचे आवाहन केले. तसेच दरवर्षी सिव्हील लाईन भागातील काही महिला दरवर्षी पर्यावरणपूरक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात, याही वर्षी त्यांनी प्लास्टिकच्या वस्तुचे वाटप न करता घरगुती साहित्याचे वाटप केले. यावर्षी भांडारकर व भांडेकर या कुटुंबियाने व त्यांच्या परिसरातील अनेक महिलांनी रोप, कुंडी, कापडी पिशव्या, कागदी लगद्याच्या वस्तू, दागिने, कापडी पर्स अशा वस्तूंची देवाणघेवाण करुन संक्रातीच्या निमित्ताने इकोफ्रेंडली गोडवा पसरवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे महिलांमध्ये कौतूक केल्या जात आहे..

Web Title: Environmental message from plant distribution in a program of Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.