वाशिममध्ये रस्त्यालगतच्या तारेच्या कुंपणातही अतिक्रमण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 15:05 IST2018-04-16T15:04:27+5:302018-04-16T15:05:25+5:30
वाशिम शहरातील मुख्य चौक व रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर परत त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून रस्त्यालगत तारेचे कुंपण करण्यात आले.

वाशिममध्ये रस्त्यालगतच्या तारेच्या कुंपणातही अतिक्रमण
वाशिम - वाशिम शहरातील मुख्य चौक व रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर परत त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून रस्त्यालगत तारेचे कुंपण करण्यात आले. मात्र, बसस्थानक परिसरात काही जण दुपारच्या सुमारास तारेच्या कुंपणातही अतिक्रमण करीत असल्याचे दिसून येते. वाशिम शहरातील काही ठिकाणं अतिक्रमणाने आपल्या कवेत घेतले होते.
त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. बस स्थानक परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने येथे वाहतूक विस्कळीत होणे ही नित्याचीच बाब झाली होती. या पृष्ठभूमीवर प्रशासनाने पोलीस बंदोबस्त अतिक्रमण हटविले. बसस्थानक परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून रस्त्यालगत तारेचे कुंपण करण्यात आले. मात्र, काही जण तार कुंपणाच्या आत जाऊन लघु व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते.