शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना वेतनाची ‘हुलकावणी’!

By admin | Updated: May 16, 2016 01:17 IST

वाशिम जिल्हा परिषदेच्या वित्त विभाग व पंचायत समितीमधील असमन्वयाचा फटका.

वाशिम: जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षकांना मार्च- एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अदा करण्याचे वित्त विभाग व पंचायत समित्यांचे आश्‍वासन १४ मे पर्यंंतही अंमलात आले नाही. वेतन नसल्याने शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यात जि.प.चे जवळपास ३५00 शिक्षक आहेत. जिल्ह्यातील सहा पंचायत समिती व जिल्हा परिषद लेखा विभागाच्या असमन्वयामुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. या शिक्षकांना गत दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने बँकांचे कर्ज, विविध प्रकारच्या पॉलिसी, गृह कर्ज यासह अन्य प्रकारचे व्यवहार ठप्प झाले आहेत. वेतन देण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी वित्त विभाग व पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने वित्त विभागाने वाशिम जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधी खात्यामधून शिक्षकांच्या वेतनापोटी ११ कोटी २४ लाख ६८ हजार रुपये संबंधित पंचायत समित्यांना, त्यांच्या तालुका शाखेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा निधी खात्यामध्ये जमा करण्यासाठी ३0 एप्रिल २0१६ रोजी मंजुरी दिली होती. याबाबतच्या सूचनाही संबंधित पंचायत समितीच्या प्रशासनाला दिलेल्या आहेत, असे जि.प. चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. देवीदास हिवाळे यांनी ६ मे रोजी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले होते.
वाशिम पंचायत समितींतर्गतच्या शिक्षकांचे वेतन का मिळाले नाही, यासंदर्भात लेखाधिकारी हेंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हा परिषदेकडून ३ मेच्या दरम्यान पंचायत समितीला ह्यवित्तह्ण प्राप्त झाले असून, चार-पाच दिवसांत वेतन अदा केले जाईल, असे ६ मे रोजी सांगितले होते; १0 मे पर्यंंतही वेतन झाले नसल्याने शिक्षक संघटनांनी वित्त विभाग व पंचायत समित्यांकडे वेतनाची मागणी केली असता, दोन-चार दिवसांत वेतन होईल, असे आश्‍वासन दिले. मात्र १५ मे पर्यंंतही शिक्षकांचे वेतन झाले नाही. वेतन झाले नसल्यामुळे विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजाचा भुर्दंड शिक्षकांना सहन करावा लागणार आहे.