अमानी केंद्रावर रुजू होण्यास कर्मचार्यांची नकारघंटा
By Admin | Updated: August 18, 2014 01:45 IST2014-08-18T01:42:37+5:302014-08-18T01:45:59+5:30
वाशिम जिल्ह्यातील ३४ पैकी २३ कर्मचारी रुजूच झाले नाहीत.

अमानी केंद्रावर रुजू होण्यास कर्मचार्यांची नकारघंटा
वाशिम : एकीकडे वाशिमवर कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगावत आहे, तर दुसरीकडे महामार्ग पोलिस मदत केंद्रावरही कर्मचार्यांच्या रिक्त पदांमुळे मदतीचा ह्यदुष्काळह्ण जाणवत आहे. वाशिम ते मालेगाव मार्गावरील अमानीजवळ असलेल्या महामार्ग पोलिस मदत केंद्रावर ३४ पैकी केवळ नवच कर्मचारी तैनात असल्याने २३ कर्मचारी रुजू कधी होणार, हा प्रश्न दीड वर्षांपासून गुलदस्त्यातच आहे.
महामार्गावरील बेताल वाहतुकीला तळय़ावर आणण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिस मदत केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्ह्यात अमानी येथे महामार्ग पोलिस मदत केंद्र आहे. या केंद्राच्या दिमतीला एक पोलिस उपनिरीक्षक, ३४ कर्मचारी व दोन चालक असा फौजफाटा देण्यात आला आहे. पोलिस कर्मचार्यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला आहे. डिसेंबर २0१२ मध्ये ३२ कर्मचार्यांचा तीन वर्षाचा सेवाकाळ संपुष्टात आल्याने मुंबई येथे डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात महामार्गाचे तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कांबळे यांच्या पॅनलने मुलाखत प्रक्रिया राबविली. मुलाखतीमधून अमानी येथे ३२ जणांची निवड करण्यात आली. यामुळे अमानी केंद्रातील रिक्त पदांचा वनवास संपण्याची आशा होती. नियुक्तीच्या पाच महिन्यानंतर नऊ कर्मचारी रुजू झाले होते. एक पोलिस उपनिरीक्षक, नऊ कर्मचारी आणि दोन चालक अशा १२ जणांच्या भरोशावर महामार्गावर ह्यवॉचह्ण ठेवण्याचे अवघड शिवधनुष्य या कर्मचार्यांना पेलावे लागत आहे. कर्मचारी नसल्याने पातूर महामार्ग चौकीला कुलूप लागले आहे, तर अमानी केंद्र कसेबसे सुरू आहे. कर्मचारी रुजू का होत नाहीत किंवा त्यांना पूर्वीच्या ठिकाणावरून कार्यमुक्त केले जात नाही, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
वरिष्ठांचे आदेश ह्यप्रमाणह्ण मानून काटेकोरपणे सेवा देणार्या पोलिस दलाच्या कर्मचार्यांना अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकार्यांच्या आदेशाचा विसर पडावा, ही बाब आश्चर्यकारक आहे. महामार्गावरील भरधाव वाहतुकीला लगाम घालणे व अपघातग्रस्तांना मदत पोहोचविणे या हेतूने स्थापन झालेले अमानी मदत केंद्रच कर्मचार्यांअभावी ह्यनिराधारह्ण बनत चालले आहे.