ई-पीक पाहणीतील अडचणी तत्काळ दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:56+5:302021-09-14T04:48:56+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या अनेक शेतकऱ्यांकडे आजही ॲन्ड्राॅईड मोबाईल नाहीत. ग्रामीण भागात पुरेशा गतीने मोबाईल नेटवर्क मिळत नाही. ...

ई-पीक पाहणीतील अडचणी तत्काळ दूर करा
जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या अनेक शेतकऱ्यांकडे आजही ॲन्ड्राॅईड मोबाईल नाहीत. ग्रामीण भागात पुरेशा गतीने मोबाईल नेटवर्क मिळत नाही. बहुतांश शेतकऱ्यांना मोबाईल हाताळता येत नाही. झाडांची नोंद करता येणे अशक्य ठरत आहे. अशा परिस्थितीत त्रुटी राहण्याची शक्यता अधिक असून त्याचा त्रास शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या त्वरित निकाली काढाव्यात. तलाठी व कृषी सहाय्यकांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश खासदार गवळी यांनी दिले.
..........
जबाबदारी निश्चित करावी- भुतेकर
ई-पीक पाहणी प्रक्रियेचा बोजवारा उडवायचा नसेल तर शासनाने प्रत्येक गावाची जबाबदारी त्या-त्या गावच्या कृषी सहायकावर निश्चित करायला हवी, असे मत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांनी व्यक्त केले. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडे सोमवारी निवेदन पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.