वाशिम जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण वाढतेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 04:41 PM2020-11-20T16:41:25+5:302020-11-20T16:41:33+5:30

Washim News वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.

Electricity Theft is on the rise in Washim district | वाशिम जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण वाढतेच 

वाशिम जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण वाढतेच 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात वीजचोरीचे प्रकार सतत वाढत आहेत.  त्यात थेट विद्युत तारांवर थेट आकडा टाकून विजेची चोरी करण्यासह विद्युत मीटरशी छेडछाड करुन किमान पन्नास पद्धतीने मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी केली जात आहे. त्यामुळे महावितरणला कोट्यवधींचा फटका बसत असून, विद्युत मीटर अधिक सुरक्षित करण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.  
घरगुती अथवा औद्योगिक वीजचोरीसाठी चोरट्यांकडून पुर्वी विद्युत तारांवर आकडे टाकण्याची पद्धत सर्रास वापरली जात होती. ग्रामीण भागात आजही हे प्रकार सुरू आहेत. त्याशिवाय पूर्वी मीटरमध्ये लोखंडाची चकती होती. तेव्हा ती लोहचुंबक लावून तिचे फिरणे थांबविले जायचे. आता मीटरही डिजिटल आकड्यांचे झाले. मीटर आधुनिक झाली, तशी त्या प्रमाणे चोरही अनेक क्लृप्त्या लढवून विद्युत चोरीचे नवीन मार्ग शोधत असून, जिल्ह्यात एकूण वापराच्या २५ टक्के विजेची चोरी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.

ग्रामीण थकबाकी जास्त
जिल्ह्यात एकूण वीज वापराच्या २५ टक्के वीजेची चोरी होत असल्याचा प्रकार घडत असतानाच थकबाकीचे प्रमाणही लक्षणीय आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागांत वीजेची थकबाकी मोठी आहे. शेतकरी, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहक मिळून तब्बल ४९ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याची माहिती महावितरणकडून प्राप्त झाली आहे. 


जिल्ह्यात केवळ एक गाव विजेविना
वाशिम जिल्ह्यात एकूण ६९० गावे आहेत. गाव तेथे वीज या धोरणानुसार प्रत्येक गावात वीज महावितरणकडून पोहोचविण्यात आली. तथापि, जिल्ह्यातील एका गावात अद्याप वीज पोहोचू शकली नाही. या गावापर्यंत वीज पोहाेचविण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने काम प्रलंबित असून, येत्या काही महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.  निधीसाठी महावितरणकडून पाठपुरावा केला जात आहे.

 जिल्ह्यात अनधिकृतपणे तारावर केबल टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर भरारी पथकाकडून कारवाई केली जात आहे. आजवर १२९ लोकांवर  दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई कायम राहणार आहे. 
-आर. जी. तायडे,            

 कार्यकारी, अभियंता महावितरण

Web Title: Electricity Theft is on the rise in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.