शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

जंगली डुकराच्या हल्ल्यात वृध्द महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 12:39 PM

सदर महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

ठळक मुद्देमहिला दुघोरा ते अडगाव या रस्त्यादरम्यानच्या भागांत  शेळ्यांचा कळप चरावयास घेऊन गेली होती. शेळ्या चारून घरी परत येत असताना वृध्द  सरस्वतीबाई यांच्यावर जंगली डुकराने अचानक हल्ला केला. उजव्या पायाच्या खालच्या बाजूस तथा डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.      

लोकमत न्युज नेटवर्क उंबर्डाबाजार (वाशिम) : जंगलात शेळ्या चारून परत घरी येत असलेल्या ग्राम दुघोरा येथील एक वृध्द महिलेवर जंगली डुकराने हल्ला केल्याची घटना १ जुन रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. यात सदर महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  उंबर्डा बाजार येथून जवळच असलेल्या ग्राम दुघोरा येथील सरस्वती गुणाजी भगत  (६५) ही वयोवृद्ध महिला दुघोरा ते अडगाव या रस्त्यादरम्यानच्या भागांत  शेळ्यांचा कळप चरावयास घेऊन गेली होती. संध्याकाळच्या वेळेस शेळ्या चारून घरी परत येत असताना वृध्द  सरस्वतीबाई यांच्यावर जंगली डुकराने अचानक हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. सरस्वती बाईच्या उजव्या पायाच्या खालच्या बाजूस तथा डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.         घटनेची माहिती मिळताच नातेवाईक तथा ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उंबर्डाबाजार येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली नवघरे यांनी तातडीने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. यावेळी आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर.नांदे यांनी मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली, तर या कामी राजु घोडे, राजू गाडवे यांनी रूग्णाच्या प्रथमोपचारापासून, तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यासाठी मोलाची भुमिका बजावली.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव