८७ टक्के पोलिसांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST2021-03-17T04:42:32+5:302021-03-17T04:42:32+5:30

जिल्हा पोलीस विभागात अधिकारी, कर्मचारी मिळून १४९० लोक कार्यरत आहेत. जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना संसर्ग बाधित व्यक्ती आढळल्यानंतर ...

Eighty-seven percent of police took corona vaccine | ८७ टक्के पोलिसांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

८७ टक्के पोलिसांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

जिल्हा पोलीस विभागात अधिकारी, कर्मचारी मिळून १४९० लोक कार्यरत आहेत. जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना संसर्ग बाधित व्यक्ती आढळल्यानंतर या पोलिसांनी कोरोना नियंत्रणासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. ही कामगिरी बजावत असताना त्यांनाच कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने १६ जानेवारीपासून त्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली. त्यात १५ मार्चपर्यंत १४९० पैकी १२९९ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना लस टोचून घेतली. हे प्रमाण ८७ टक्के आहे. त्यात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५०९ आहे.

--------------

३४ टक्के पोलिसांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १४९० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी १२९९ जणांनी पहिला डोस घेतला. त्यात पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५०९ आहे. या ५०९ कर्मचाऱ्यांत ४७७ अंमलदार आणि ३२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अर्थात दुसरा डोस घेणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण ३४ टक्के आहे.

----------------

७० टक्के महिला पोलिसांनी घेतली लस

१) जिल्हा पोलीस दलात एकूण अधिकारी, कर्मचारी संख्येच्या ३० टक्क्यांहून अधिक महिला पोेलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण ८७ टक्के असले तरी महिला पोलिसांचे प्रमाण ७० टक्के आहे. हे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जात आहे.

२) जिल्ह्यात एकूण पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला पोलिसांचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महिला पोलिसांचे प्रमाण ७० टक्केच आहे. सध्या कार्यरत महिला पोलिसांपैकी काही महिला पोलीस कर्मचारी आजारी रजेवर आहेत, तर काही महिला कोमॉरबिड असल्याने त्यांचे लसीकरण थांबले आहे.

---------

जिल्ह्यात एकूण पोलीस - १३९७

लस घेतलेले पोलीस - १२१४

जिल्ह्यात एकूण पोलीस अधिकारी - ९३

लस घेतलेले पोलीस अधिकारी - ८५

Web Title: Eighty-seven percent of police took corona vaccine