आठ नवीन रुग्णवाहिका मिळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:41 IST2021-05-14T04:41:01+5:302021-05-14T04:41:01+5:30

000 ग्रामसेवक, शिक्षकांची पदे रिक्त वाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी, काटा, अनसिंंग जिल्हा परिषद गटातील ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षकांची ...

Eight new ambulances were received | आठ नवीन रुग्णवाहिका मिळाल्या

आठ नवीन रुग्णवाहिका मिळाल्या

000

ग्रामसेवक, शिक्षकांची पदे रिक्त

वाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी, काटा, अनसिंंग जिल्हा परिषद गटातील ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षकांची जवळपास ३० पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली. परंतु, अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही.

०००००

मोबदला देण्याची धरणग्रस्तांची मागणी

वाशिम : रिसोड तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांकरिता जमीन संपादित केलेले काही शेतकरी अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. मोबदला तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी १३ मे रोजी पाटबंधारे व जलसंधारण विभागाकडे केली.

००००००००००

पोहरादेवी येथे आणखी दहा बाधित

वाशिम : मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे कोरोनाबाधित रुग्ण अधिक संख्येने आढळून येत असून, यामध्ये गुरुवार, १३ मे रोजी आणखी दहा जणांची भर पडली. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य चमू गावात ठाण मांडून असून, तपासणी केली जात आहे.

Web Title: Eight new ambulances were received