वाशिम जिल्ह्यात पाणी गुणवत्तेसंदर्भात गावोगावी प्रशिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:54 IST2018-05-09T14:54:07+5:302018-05-09T14:54:07+5:30
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची पूर्वतयारी म्हणून गावोगावी स्थानिक पातळीवरील कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे. सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाणी गुणवत्ता यावर भर देण्यात आला.

वाशिम जिल्ह्यात पाणी गुणवत्तेसंदर्भात गावोगावी प्रशिक्षण !
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची पूर्वतयारी म्हणून गावोगावी स्थानिक पातळीवरील कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे. सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाणी गुणवत्ता यावर भर देण्यात आला.
वाशिम जिल्हयाला १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट होते. सदर उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर आता बांधलेल्या शौचालयाचा पूर्ण वापर करणे, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, सार्वजनिक शौचालये व शोषखड्डे यावर भर दिला जाणार आहे. तत्पूर्वी पंचायत समिती गणनिहाय संबंधित कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पाणी वापर संस्थेचे सदस्य आदींनी यासंदर्भात माहिती दिली जात आहे. ८ व ९ मे रोजी मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दोन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. पंचायत समिती सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने यांच्यासह जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्वच्छता कक्षाचे मुख्य प्रशिक्षक शंकर आंबेकर, प्रफुल काळे, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता घाडगे, गिरी, राठोड, आखाडे, घोडे, राऊत, रिचा केजकर आदींची उपस्थिती होती. यावेळी स्वच्छ पाणी, पाणी गुणवत्ता, अस्वच्छ पाण्याचे दुष्परिणाम आदीसंदर्भात माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला इंझोरी सर्कलमधील पाचही गावाचे पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जलसुरक्षक, आशा, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायतच्या कर्मचाºयांची उपस्थिती होती.