शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

‘डम्पिंग यार्ड’ बनलेल्या तलावाला ‘जीवनदान’

By admin | Updated: May 9, 2016 01:51 IST

लोकसहभागाचा परिणाम: गाळ उपसण्याचे काम वेगात.

मंगरुळपीर : शहरातील प्राचीन गावतलावाचा मागील काही वर्षांंपासून कचरा टाकण्यासाठी (डम्पिंग यार्ड) उपयोग होत होता. त्यामुळे कधीकाळी शहराच्या जलसाठय़ात महत्त्वाचे स्थान असलेल्या या तलावाला डम्पिंग यार्डचे स्वरूप प्राप्त झाले होते; मात्र शहरातील काही समाजसेवकांनी एकत्रित येऊन आर्ट ऑफ लिव्हिंग या सामाजिक संघटनेच्या सहकार्याने गेल्या आठ ते दहा दिवसात या तलावातील हजारो ब्रास गाळाचा उपसा केला. त्यामुळे शेवटच्या घटका मोजत असलेल्या या तलावाला जीवनदान मिळाल्याचे दिसत आहे.
मंगरुळपीर शहरातील पालिकेच्या शाळा क्रमांक दोन लगत असलेला गाव तलाव या भागातील जलपातळी वाढविणारा एकमेव घटक आहे. सन १९७२ च्या काळात डॉ. संजीव वार्डेकर हे नगराध्यक्ष असतानाचे काळात तलावाला भरपूर पाणी असायचे, त्याकाळात तलाव शहराचे वैभव बनला होता. तलावातील जलभरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरी व बोअरवेलची जलपातळी भरपूर प्रमाणात वाढत चालली होती. नंतरच्या काळात मात्र तलावाकडे जणू सर्वांंचेच दुर्लक्ष होत राहिले. त्यामुळे तलावाचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते. अनेकांना मनोमन वाटूनही त्यांना काही करता येत नव्हते. त्यामुळे हा तलाव कायमचा नाहीसा तर होणार नाही अशी चिंता सर्वसामान्यांना सतावत होती. अशातच समाजसेवक सचिन कुळकर्णी यांच्या पुढाकारातून या तलावाच्या जीवदान अभियानाला सुरुवात करण्यात आली, जलपुनर्भरणासाठी नावाने हे अभियान राबविण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे देवेंद्र पाटील, दीपक लोहिया, बबलू गावंडे, विवेक चव्हाण, डॉ. बियाणी, सतीश रत्नपारखी, दिनेश राठोड, आत्माराम चव्हाण, मनोज इंगोले, प्रा. अरुण इंगळे, प्रा. वीरेंद्रसिंह ठाकूर याच्यासह मान्यवरांनी सहभाग घेऊन जल चळवळीला गाठ उपशाचे काम गेले आठ ते दहा दिवसांपासून अविरत सुरू आहे. जवळपास हजारो ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला असून, दोन टिप्पर व पाच ट्रॅक्टरच्या माध्यमातून अहोरात्र गाळाचा उपसा सुरू आहे. तलावाच्या पुनर्भरणासाठी मदतीचे अनेक हात पुढे सरसावत असल्याने काम करणार्‍यांनाचा उत्साहसुद्धा वाढत चालला आहे.