ग्रामसेवकाच्या बेमुदत संपामुळे विकास कामे प्रभावीत
By Admin | Updated: July 14, 2014 23:34 IST2014-07-14T23:34:37+5:302014-07-14T23:34:37+5:30
१२ दिवसांपासुन तालुक्यातील ३९ ग्रामसेवक, ५ ग्रामविकास अधिकारी त्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर गेल्यामुळे दुष्काळी परिस्थीतीत

ग्रामसेवकाच्या बेमुदत संपामुळे विकास कामे प्रभावीत
मंगरुळपीर : मागील १२ दिवसांपासुन तालुक्यातील ३९ ग्रामसेवक, ५ ग्रामविकास अधिकारी त्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर गेल्यामुळे दुष्काळी परिस्थीतीत ग्राम विकासावर प्रचंड परिणाम होत आहे. अनेक योजना थंडबस्त्यात पडल्या आहेत. त्याच बरोबर सद्या तालुका कोरड्या दुष्काळाच्या सावटात असुन पाणी व चारा टंचाईने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.दोन दिवसापुर्वी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत ग्रामसेवकाच्या गैरहजेरीमुळे अनेक प्रकारच्या अडचणी उपस्थित झाल्या होत्या. ग्रामसेवक संघटनेने आपल्या विविध मागण्या संदर्भात पुकारलेल्या बेमुदत संपामुळे गेल्या १२ दिवसापासुन खेड्याची अवस्था चिंतनीय झाली आहे दि २ जुलै रोजी पासुन संपावर गेलेल्या ग्रामसेवकांनी कार्यालयाच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकार्यांच्या ताब्यात दिल्या आहेत. संपामुळे शाळा प्रवेशासाठी पाल्याना लागणारे जन्माचे दाखले, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना,ग्राम पंचायत स्तरावर राबविल्या जाणार्या आदी योजनेची कामे ठप्प झाली आहे. मृग नक्षत्र कोरडा गेला त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.त्याच बरोबर जनावरासाठी चारा सुध्दा उपलब्ध नाही अशा परिस्थीत गावातील महत्वाच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासठी नागरिकां बरोबर मोलाची भुमिका पार पाडणारे ग्रामसेवक संपावर असल्याने नागरिकांना अनेक अडचणी भेडसावत आहे. पावसाळय़ाचे दिवस असल्यामुळे खेडे भागात अस्वच्छते वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याच्या विहीरीत ब्लिचींग पावडर टाकण्या बाबत अडचणी येत आहे आदी समस्या संपामुळे निर्माण झाल्या आहेत. नुकतीच पंचायत समितीच्या वतीने पार पडलेल्या आढावा बैठकीत अनेक प्रकारच्या समस्या ग्रामीण भागात असल्याचा सुर उमटला मात्र यावेळी त्या समस्या निकाली काढण्या संदर्भात व उपाय योजना करण्या विषयी ग्रामसेवक संपावर असल्यामुळे रोजगार सेवकांकडुन पुढील कारवाई करण्याच्या सुचना संबधीतांनी दिल्या.मंगरूळपीर पंचायत समिती अंर्तगत ७६ ग्राम पंचायत असुन त्यासाठी ४८ ग्रामसेवक व ६ ग्रामविकास अधिकारी असे ५४ पदे मंजुर आहेत त्यापैकी ४२ ग्रामसेवक कार्यरत आहेत त्यात ३ कंत्राटी ग्रामसेवकांचा समावेश आहे. ग्रामसेवकाची ६ पदे रिक्त आहेत.६ ग्रामविकास अधिकारी पैकी ५ कार्यरत असुन फक्त एकच पद रिक्त असल्याची माहीती मिळाली आहे.