उपविभागीय अधिकारीपदी मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:41+5:302021-02-05T09:23:41+5:30
मंगरुळपिर येथील उपविभागीय अधिकारी देशपांडे हे बदलीवर दारव्हा येथे गेल्यानंतर कारंजाचे उपविभागीय अधिकारी जाधव यांच्याकडे मंगरुळपिर उपविभागीय अधिकारी यांचा ...

उपविभागीय अधिकारीपदी मुळे
मंगरुळपिर येथील उपविभागीय अधिकारी देशपांडे हे बदलीवर दारव्हा येथे गेल्यानंतर कारंजाचे उपविभागीय अधिकारी जाधव यांच्याकडे मंगरुळपिर उपविभागीय अधिकारी यांचा प्रभार होता. परंतु कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने मंगरुळपिर तालुक्यातील नागरिकांना आपल्या कामासाठी त्रास होत होता. मंगरुळपिरचे उपविभागीय अधिकारी म्हणून हा त्यांचा परिविक्षाधीन कालावधी आहे. सध्या मंगरुळपिरला वैभव वाघमारे व सखाराम मुळे हे उच्च श्रेणीतील अधिकारी लाभल्याने शहरी, ग्रामीण भागातील जनतेला नक्कीच न्याय मिळेल व अवैध रेती तस्करी, राशन तांदूळ व गहू यांच्या माफियांच्या मुसक्या आवळल्या जातील , तसेच तहसील कार्यालय परिसरातील दलालांना चांगलाच चाप बसेल. पदभार स्वीकारला त्यावेळी नायब तहसीलदार सागर कुलकर्णी, बनसोड,मंडळ अधिकारी वाडेकर, तलाठी चौधरी ,महामुने आदी हजर हाेते.