शेतकर्‍यांची दूबार पेरणीही संकटात

By Admin | Updated: August 6, 2014 00:16 IST2014-08-05T23:21:25+5:302014-08-06T00:16:31+5:30

पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही नाही म्हणून दूसर्‍यांदा पेरणी केली. आता तीही सुकण्याच्या मार्गावर

Due to the sowing of farmers in distress | शेतकर्‍यांची दूबार पेरणीही संकटात

शेतकर्‍यांची दूबार पेरणीही संकटात

वाशिम : पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही नाही म्हणून दूसर्‍यांदा पेरणी केली. आता तीही सुकण्याच्या मार्गावर असल्याने करावे तरी काय या संकटात वाशिम तालूक्यातील सावरगाव जिरे येथील शेतकरी सापडले आहेत. २0१३-१४ च्या खरिप हंगामात केलेल्या पेरणीव अतवृष्टीने संकट आणले. या संकटाने शेतकरी पूरता हतबल झाला होता. परंतू या संकटातून कसेबसे स्वत:ला सावरत सावरगावातील शेतकर्‍यांनी कशीबशी रब्बीची पेरणी केली. परंतू हातातोंडाशी आलेला रब्बी पिकाचा घास गतवेळच्या रब्बी हंगामात झालेल्या गारपीटीने घालविला. त्यामुळे शेतकर्‍यांचे पूरते कंबरडे मोडले. आता चरीतार्थ चालवावा तरी कसा या विवंचनेतील शेतकर्‍यांनी पून्हा स्वत:ला सावरत चालू खरिप हंगामात जूलै महिण्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली. परंतू पेरलेले न उगवल्याने शेतकर्‍यांनी पून्हा २२ ते २६ जूलै दरम्यान त्याआधी आलेल्या रिमझीम पावसाचे भरवश्यावर दूबार पेरणी केली. परंतू ती पेरणीही आजमीतला संकटात असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणने आहे. आधीच दूबार पेरणीचे संकट ओढविल्याने शेतकरी एकरी किमान १0 हजार रुपयाने डूबला असतांना आता पूढे उभ्या ठाकलेल्या तिबार पेरणीवर मार्ग काढावा तरी कसा असा प्रश्न सावरगाव जिरे येथील शेतकर्‍यांना पडला आहे. दूबार पेरलेले पीकं धोक्यात आले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे यावेळच्या खरिपात शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामूळे निसर्गाचा लहरीपणा असाच कायम राहिल्यास यातून मार्ग काढावा तरी कसा असा प्रश्न सावरगाव जिरे येथील शेतकर्‍यांना आजमितीला भेडसावत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Due to the sowing of farmers in distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.