"शुभमंगल" होताच वरपित्याचा हृदयविकाराने मृत्यू!
By Admin | Updated: May 15, 2017 19:32 IST2017-05-15T19:32:46+5:302017-05-15T19:32:46+5:30
मानोरा (वाशिम) : मुलाच्या लग्नात अखेरचे मंगलाष्टक आटोपल्यानंतर "शुभमंगल सावधान"चा गजर सुरू असतानाच वरपित्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

"शुभमंगल" होताच वरपित्याचा हृदयविकाराने मृत्यू!
ऑनलाइन लोकमत
मानोरा (वाशिम) : मुलाच्या लग्नात अखेरचे मंगलाष्टक आटोपल्यानंतर "शुभमंगल सावधान"चा गजर सुरू असतानाच वरपित्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. भुली (ता. मानोरा) येथे १४ मे रोजी घडलेल्या या घटनेने आनंदाच्या विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट कोसळले.
याबाबत अधिक माहिती अशी, की भुली येथील प्रतिष्ठित शेतकरी शांताराम गणपतराव चव्हाण यांचा मुलगा अशोक याचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील दहिसावळी येथील ुमुलीशी १४ मे रोजी थाटामाटात संपन्न झाला. रितीरिवाजानुसार मंगलाष्टके, धार्मिक विधी पार पडला. यादरम्यान वधुवरांच्या डोक्यावर अक्षता पडताच वरपिता शांताराम यांना अचानक घाम सुटला. यावेळी लग्नमंडपाच्या बाहेर येवून ते जमिनीवर कोसळले. कुटूंबियांनी लगेच त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही दु:खद वार्ता विवाहस्थळी पसरताच सर्वत्र शोककळा निर्माण झाली.