अमानी परिसरात तीव्र पाणी टंचाईचे सावट
By Admin | Updated: February 27, 2015 00:53 IST2015-02-27T00:53:41+5:302015-02-27T00:53:41+5:30
मालेगाव तालुक्यातील प्रकार; पुरेशा निधीअभावी उन्हाळय़ासाठी पूरेशा उपाययोजनाच नाहीत.

अमानी परिसरात तीव्र पाणी टंचाईचे सावट
अमानी (मालेगाव, जि. वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अमानी येथे सद्यस्थितीत (दि.२६) पाणीटंचाई निर्माण होत आहे. येथे दरवर्षी जानेवारीपासून पाणी टंचाई निर्माण होते. पाणी टंचाई निवारण करण्यासाठी बोअर, विहीर अधिगृहीत केल्या जातात. यामुळे पाणि टंचाई दुर करण्यास मदत होते. अमानी येथे जूनी नळ योजना आहे. या योजनेमधील विहीरीचे पाणी डिसेंबर अखेरपर्यंत पूरते. पुरेश्या उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांकडे पाणीपट्टीची मागणी करण्यात येते. परंतू पाणीपट्टी समाधानकारक वसुल होत नाही. पाणीपट्टी वसुली नसल्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना कशा कराव्या? हा प्रश्न भेडसावत आहे. पुरेशा निधीअभावी सन २0१५ च्या उन्हाळय़ात पूरेशा उपाययोजना करणे शक्य होणार नसल्याचे स्थानिक प्रशासनाला वाटत आहे. यामुळे पाणी टंचाईची धग अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन ग्रामपंचायततर्फे वारंवार केले जाते. अमानी येथे पूरक नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे ते आज रोजी पुर्ण झाले नाही येत्या दोन ते तिन महिन्यात सदर काम पूर्ण होईल परंतू आज रोजी पाणी टंचाई सामोरे जावे लागत असल्यामुळे बोअर अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीला सादर केले आहे. पंचायत समितीने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी २६ फेब्रुवारी रोजी केली आहे.