दुष्काळसदृष्य परिस्थितीत जगविली रस्त्याच्या कडेची झाडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:17 IST2017-09-12T20:17:18+5:302017-09-12T20:17:18+5:30
यंदा पावसाचे प्रमाण घटल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई जाणवण्यासोबतच नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. शेतशिवारांमधील पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. मात्र, अशा दुष्काळसदृष स्थितीतही तालुक्यातील ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली निंबाची झाडे जगविण्याची किमया करून दाखविली.

दुष्काळसदृष्य परिस्थितीत जगविली रस्त्याच्या कडेची झाडे!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदा पावसाचे प्रमाण घटल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई जाणवण्यासोबतच नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. शेतशिवारांमधील पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. मात्र, अशा दुष्काळसदृष स्थितीतही तालुक्यातील ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली निंबाची झाडे जगविण्याची किमया करून दाखविली.
विविध कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून झाडांची बेसुमार कत्तल केली जात असल्याने गावेच्या गावे उजाड होण्यासोबतच पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. त्याचा थेट परिणाम पर्जन्यमानावर झाला असून पुर्वीच्या तुलनेत आता फारच कमी प्रमाणात पाऊस होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेवून शासनस्तरावरून ‘झाडे लावा झाडे जगवा’चा संदेश देत वृक्षलागवडीची मोहिम राज्यभरात राबविण्यात आली. वाशिम जिल्ह्यातही वनविभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेला बहुपयोगी वृक्षांची लागवड करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित गावे, ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आलेली आहे. मात्र, पाणीटंचाईचे कारण समोर करून अनेक ग्रामपंचायतींनी वृक्ष संगोपनाकडे दुर्लक्ष केले. ब्राम्हणवाडा ग्रामपंचायत मात्र त्यात अपवाद ठरली असून वाशिम-ब्राम्हणवाडा रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या झाडांना जगविण्याकरिता ग्रामपंचायतीने प्रयत्न चालविले आहेत. विहिरी, हातपंपांमधून पाणी घेवून झाडांना पुरविले जात असल्याने ही झाडे बहरल्याचे दिसून येत आहे.