शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी सवलती लागू; परीक्षा शुल्क परत कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : रिसोड तालुक्यासह दोन महसूल मंडळात दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शालेय व ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यासह दोन महसूल मंडळात दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. मात्र, तत्पूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे परीक्षा शुल्काचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणे अपेक्षीत आहे. याकडे संबंधित यंत्रणा लक्ष कधी देणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गाव, तालुका व जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू केल्या जात होत्या. यावर्षी दुष्काळ व दुष्काळसदृश परिस्थिती जाहिर करण्याच्या निकषात बदल करण्यात आलेला आहे. पावसाची सरासरी, पीक उत्पादनातील घट, जमिनीची आर्द्रता, पावसाचा खंड आदी बाब दुष्काळ जाहिर करताना विचारात घेतल्या जातात. यावर्षी अनेक तालुक्यांमध्ये तसेच महसूल मंडळात जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाने सरासरी गाठली नाही. कमी पर्जन्यमान झाल्याने उत्पादनात घट आली. रिसोड तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे तसेच मानोरा तालुक्यातील उमरी महसूल मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे दुष्काळी सवलती लागू झाल्या. मात्र, दुष्काळ जाहिर होण्यापूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत. गतवर्षीदेखील दुष्काळ जाहिर झालेला होता. तेव्हाही परीक्षा शुल्काचा भरणा झाल्यानंतर दुष्काळी सवलतीची घोषणा करण्यात आली होती. गतवर्षीचे परीक्षा शुल्क अद्याप विद्यार्थ्यांना परत मिळालेले नाही. हा आकडा जवळपास १० लाखांच्या घरात जातो. आताही रिसोड तालुका तसेच जऊळका रेल्वे व उमरी महसूल मंडळातील विद्यार्थ्यांनील परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे सदर शुल्क परत मिळावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षणdroughtदुष्काळ