घाटात सुटले चालकाचे नियंत्रण; ट्रॅक्टर उलटून जखमी झाले चार जण!
By सुनील काकडे | Updated: February 2, 2024 15:06 IST2024-02-02T15:05:50+5:302024-02-02T15:06:15+5:30
अपघात १ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडला

घाटात सुटले चालकाचे नियंत्रण; ट्रॅक्टर उलटून जखमी झाले चार जण!
सुनील काकडे, वाशिम : जिल्ह्यातील कारंजा-मानोरा रस्त्यावरील वापटा गावाजिकच्या घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात १ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, घाटातील उताराच्या रस्त्यावरून ट्रॅक्टर चालवत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे काही कळण्याच्या आत ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जावून पूर्णत: उलटले. हा अपघात इतका गंभीर होता की, ट्रॅक्टरचा समोरचा भाग आणि ट्राली वेगवेगळी झाली. या अपघातात पंकज जयराम राठोड (३२), दिलीप नामदेव चव्हाण (३५), अविनाश रामराव राठोड (३२), प्रवीण राठोड (२७) हे चार जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच ‘सास’चे कार्यकर्ते लक्ष्मण चव्हाण, डाॅ. सोहेल खान यांनी घटनास्थळी दाखल होवून जखमींना उपचारार्थ कारंजाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी प्रथमोपचार करून जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे ‘रेफर’ केले.