नगरपरिषद परिसरात अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचं श्रमदान!
By नंदकिशोर नारे | Updated: March 11, 2024 15:37 IST2024-03-11T15:37:20+5:302024-03-11T15:37:35+5:30
नगरपरिषद इमारत परिसरात स्वच्छता श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करुन मुख्याकारी पंत यांनी शहरात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखावी असा संदेश दिला आहे.

नगरपरिषद परिसरात अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचं श्रमदान!
वाशिम : स्थानिक नगरपरिषद परिसरात ११ मार्च राेजी स्वच्छता श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डाॅ. अपुर्वा बासुर यांच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सकाळी ७ ते १०:३० या वेळात नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी नगर परिषदेचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यामध्ये स्वत: डाॅ० बासूर यांनी हातात झाडू घेऊन सहभाग घेतला हाेता.
नगरपरिषद इमारत परिसरात स्वच्छता श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करुन मुख्याकारी पंत यांनी शहरात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखावी असा संदेश दिला आहे. या उपक्रमात नगरपरिषदेतील विविध विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी मुख्याधिकारी डाॅ. अपूर्वा बासूर सह बांधकाम विभागाचे अभियंता अशाेक अग्रवाल, कार्यालयिन अधिक्षक राहुल मार्कंड, स्वच्छता निरिक्षक जितु बढेल, कर निरिक्षक प्रकाश दाभाडे, पाणी पुरवठा अभियंता गजानन हिरेमठ, उज्वल देशमुख, विद्युत विभागाचे गणेशपुरे, अमाेल कुमावत, मिळकत विभागाचे वैभव पांडे यांच्यासह संताेष किरळकर, रवी हुरकट, साखरकर, मुन्ना खान, उल्हामाले , नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी माेठया संख्येने उपस्थित हाेते.