दोडकीवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले!

By Admin | Updated: December 26, 2014 00:37 IST2014-12-26T00:37:55+5:302014-12-26T00:37:55+5:30

ग्रामस्थांचे पाण्या अभावी हाल

Dodkiwadi District Collector's office | दोडकीवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले!

दोडकीवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले!

वाशिम : तालुक्यातील दोडकी येथे सन २00८-0९ ला भारत निर्माण योजनेतून गावाला पाणीपुरवठा व्हावा याकरिता शासनाने एक विहीर दिली व हातपंप दिले; मात्र यावर ताबा करून काही व्यक्तिने पाणी समस्या निर्माण केल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून दयावे, या मागणीसाठी दोडकीवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर २५ डिसेंबर रोजी धडकले होते. दोडकीवासीयांनी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर संबंधित पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी, बी.डी.ओ., ग्रामसेवक यांना फोनवर बोलून तत्काळ व्यवस्था करण्याचे आदेश दिले, यावेळी संजय वैरागडे, माणिकराव बांगर यांच्यासह दोडकीवासी हजर होते. यावेळी संबंधितांनी आश्‍वासन दिल्याने ग्रामस्थ शांत झाले असले तरी आश्‍वासनाप्रमाणे तत्काळ पिण्याचे पाण्याची व्यवस्था झाली नाही तर संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रामेश्‍वर कि. पाटोळे, देवानंद गायकवाड (तालुका कार्याध्यक्ष), गजानन सोपान भालेराव (ता. सचिव), विठ्ठल भालेराव, गजानन सुभाष भालेराव, अशोक भालेराव, आत्माराम भालेराव, राजू भालेराव, ज्ञानबा भालेराव, संतोष आमटे, संतोष भालेराव, आश्रू रणबावळे, कुंडलिक जाधव, ज्ञानबा भालेराव, जिजेबा उबाळे, रामभाऊ गायकवाड, गणेश भालेराव, नवृत्ती भालेराव, रामभाऊ गवळी, पंचफुला भालेराव, गयाबाई गायकवाड, सविता भालेराव यांच्यासह गावकर्‍यांनी दिला.

Web Title: Dodkiwadi District Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.