पीक विमा रक्कम कर्ज खात्यात जमा करु नये - उपसभापती रजनी गावंडे यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:04 IST2018-06-13T14:04:18+5:302018-06-13T14:04:18+5:30
रक्कम परस्पर कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती रजनीताई गावंडे यांनी जिल्हा बॅकेंच्या अध्यक्ष संतोष कोरपे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.

पीक विमा रक्कम कर्ज खात्यात जमा करु नये - उपसभापती रजनी गावंडे यांचे निवेदन
मानोरा : शेतकऱ्यांना मिळालेल्या पिक विम्यातुन बँका शेतकऱ्यांकडे असलेला चालु व नगदीने भरलेल्या पिक विम्याची रक्कम कर्जखात्यात रुपात करुन घेत आहे. ही रक्कम परस्पर कपात करुन घेत आहे. ही रक्कम परस्पर कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती रजनीताई गावंडे यांनी जिल्हा बॅकेंच्या अध्यक्ष संतोष कोरपे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
गावंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की,यावर्षी पिकविमा कंपनीकडून चालु व नगदीने भरलेल्या शेतकऱ्यां ना पिक विम्याची रक्कम मिळाली आहे, परंतु सदर मिळालेली रक्कम बँका पिक कर्जात कपात करुन घेत आहेत. त्यामुळे सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातुन काढता येत नाही. मागील दुष्काळी वर्षाचा व पेरणीचा कालावधी लक्षात घेता सदर शेतकऱ्यांना मंजुर झालेली पिक विम्याची रक्कम ही त्यांच्या बचत खात्यात जमा करुन शेतकºयांना नगदी रक्कम मिळेल याबाबत आपण बँकाना आदेशीत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी राजु गुल्हाणे, राजकुमार गावंडे, निलेश गावंडे, प्रभाकर गावंडे, पंजाब राऊत, रघुनाथ पवार, किरण मिसाळ, महादेव पाटील सोयजना प्रदीप मिसाळ, विजय जारंडे, विजय चोपडे, अमोल गावंडे, दशरथ रुढे, प्रमोद गावंडे, श्रीकांत चिपडे, गजानन गावंडे, दादाराव गावंडे, सरपंच कुपटा आदि उपस्थित होते.