भर जहागीर येथे ज्ञानेश्वरी पारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST2021-09-16T04:51:54+5:302021-09-16T04:51:54+5:30

: येथील संत भगवान बाबा गणेश मंडळाद्वारे मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात; परंतु यंदा गणपती मंडळाने ...

Dnyaneshwari Parayan at Bhar Jahagir | भर जहागीर येथे ज्ञानेश्वरी पारायण

भर जहागीर येथे ज्ञानेश्वरी पारायण

: येथील संत भगवान बाबा गणेश मंडळाद्वारे मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात; परंतु यंदा गणपती मंडळाने कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत सकाळी आठ ते १० पर्यंत ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले आहे.

ह. भ. प. दिनकर महाराज जायभाये यांच्या माध्यमातून येथील संत भगवान बाबा गणेश मंडळाने कोरोनातील नियमांची योग्य अंमलबजावणी करीत ज्ञानेश्वरी पारायण होत असून, यामध्ये वीस महिला पुरुषांनी सहभाग घेतला आहे. पारायणाचा कालावधी सात दिवसांचा असून, या पारायणाद्वारे अनेकांना प्राकृत भाषेचे ज्ञान प्राप्त होत असल्याची माहिती दिनकर महाराज यांनी दिली आहे. पारायणातील भक्तांसाठी माजी जि. प. सदस्य किसनराव गिते, भगवान जायभाये यांच्यासह अनेकांनी चहा, फराळाची व्यवस्था मोफत केली.

Web Title: Dnyaneshwari Parayan at Bhar Jahagir