दिवाळीत रेल्वे, ट्रॅव्हल्सचीही दिवाळी

By Admin | Updated: October 23, 2014 01:05 IST2014-10-23T00:53:21+5:302014-10-23T01:05:23+5:30

खासगी लक्झरी बसेसचे भाडे महागले.

Diwali railway, Diwali Travels | दिवाळीत रेल्वे, ट्रॅव्हल्सचीही दिवाळी

दिवाळीत रेल्वे, ट्रॅव्हल्सचीही दिवाळी

शिखरचंद बागरेचा /वाशिम
दिवाळीचा सण म्हटला की ,बाहेरगावी वास्तव्य करणार्‍यांना राहत्या गावी जाण्याची ओढ लागलेली असते तर लहान बालकांची मामाच्या गावाला जायची लगबग सुरु असते. या अनुषंगाने रेल्वेगाडी असो अथवा खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स जे मिळेल, त्या वाहनाने प्रवासी जातात. नेमकी हीच बाब रेल्वे व खासगी लक्झरीच्या पथ्यावर पडत आहेत. दिवाळीच्या मोसमात रेल्वे व खासगी लक्झरींची दिवाळीच साजरी होत आहे. सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे.
दिवाळी व भाऊबिज निमित्त सर्वांचीच आपापल्या गावांना जाण्यासाठी घाई असते. गत तीन दिवसांपासून दिवाळी साजरी करण्यासाठी रेल्वे व खासगी लक्झरी बसेस प्रवाशांनी खचाखच भरून धावत आहेत. रेल्वे आणि लक्झरी बसेसमध्ये आरक्षणही फुल्ल झाले असल्याचे दिसून येते. कुटूंबासह गावी जाण्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रत्येक जन रेल्वे व ट्रॅव्हल्सचे आगावू तिकीट काढून आरक्षण करण्याचा प्रयत्न करीत असतो.
वाशिम जिल्ह्याचा विचार करता, रेल्वे स्टेशन आणि खासगी लक्झरींचे आरक्षण फुल आहे. दिवाळीची गर्दी कॅश करण्याबरोबरच लक्झरी बसेसने भाड्यातही दामदुप्पट वाढ केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. मात्र, गावी जाण्याच्या धावपळीत अतिरिक् त भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दक्षिण मध्य रेल्वे लाईनवर असलेल्या वाशिम रेल्वे स्थानकावरुन उत्तर व दक्षिण दिशांच्या माध्यमाने देशाच्या चारही दिशेला जाता येते. येथून अकोला, नागपूर, पुर्णा, नांदेड, हैद्राबाद, काचिगुडा, सिंकदराबाद, हैद्राबाद, यशवंतपुर, इंदौर, गंगानगर, अजमेर, जयपूर, अमृतसर, आदी ठिकाणी जाता येते. रेल्वे विभागाच्या पुर्व, पश्‍चिम, उत्तर, दक्षिण या भागात जाणार्‍या जवळपास सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून या गाड्यांच्या आरक्षणासाठी वेटींग लीस्ट लागली आहे.

*परतीचा प्रवासही महागणार
खासगी लक्झरी बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांना मुंबई, पुणे या शहरातून वाशिम जिल्हय़ात आगमन करताना सध्या ६५0 ते ७५0 रुपये भोड मोजावे लागत आहे. मात्र दिवाळी नंतर पुन्हा या शहरांकडे जाणार्‍या प्रवाशांना दुप्पट भाडे म्हणजे १३00 ते १४00 रुपये मोजावे लागणार आहेत. येतानाचा स्वस्त झालेला प्रवास परत जाताना महाग पडणार आहे.

Web Title: Diwali railway, Diwali Travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.