पोलिस निरिक्षकांच्या जिल्हार्तंगत बदल्या
By Admin | Updated: July 12, 2014 23:06 IST2014-07-12T23:06:51+5:302014-07-12T23:06:51+5:30
पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकार्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचा आदेश ११ जुलै रोजी प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांनी निर्गमित केले आहेत.

पोलिस निरिक्षकांच्या जिल्हार्तंगत बदल्या
वाशिम : जिल्हा पोलिस दलातील वाशिम शहर पोलिस स्टेशन, मंगरूळपीर पोलिस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा वाहतुक शाखा व अनसिंग पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकार्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचा आदेश ११ जुलै रोजी प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांनी निर्गमित केले आहेत. . जिल्हा वाहतुक शाखेच्या पोलिस निरिक्षकाचे पद बर्याचा दिवसापासुन रिक्त होते. त्याठिकाणी या अगोदर पोलिस निरिक्षक राक्षसकर हे होते त्यांच्या जागेवर मंगरूळपीरचे पोलिस निरिक्षक सानप यांची नियुक्ती करण्यात आली. तर, मंगरूळपीर पोलिस स्टेशनची सुत्रे पोलिस निरिक्षक शेख रऊफ यांच्याकडे सोपविली. वाशिम शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार वा.तु. वांढरे यांची डीएसबी शाखेमध्ये बदली करण्यात आली. वांढरे यांचे जागेवर नुकतेच हिंगोली येथून आलेले पोलिस निरिक्षक सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली. डीएसबी ब्रँचमधील पोलिस निरिक्षक पाटील यांची स्थानिक गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली तर अनसिंग येथील पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरिक्षक कदम यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलिस दलाकडून प्राप्त झाली. शहर पोलिस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार आर.व्ही. सोनुने यांची कारकिर्द ठाणेदाराला शोभेल अशी होती. सोनुने यांची बदली झाल्यानंतर शहरामधील कायदा व सुव्यवस्थेची एैसी तैसी झाली. सोनुने यांच्या रिक्त जागेवर ठाणेदार म्हणुन वा.तु. वांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, वांढरे यांना पोलिस स्टेशनमधील ह्यअँडमिनिस्ट्रेशनह्ण हाताळता आले नाही. याशिवाय वांढरे यांच्या कारकिर्दीमध्ये शहरामध्ये गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत चालला होता. शहर पोलिस स्टेशन मधील कर्मचार्यांच्याही अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे ठाणेदार वा.तु. वांढरे यांची डीएसबी शाखेमध्ये बदली करण्यात आली.